कर्जत (आशिष बोरा यांजकडून):-कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेशाने कर्जत येथे आज 8 मे रोजी दादा पाटील महाविद्यालया जवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. सायंकाळी सात ते सकाळी सात या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आलेली असून यादरम्यान कोणीही बाहेर फिरू नये. दुचाकी वा चारचाकीचा वापर करू नये असे आदेश काढलेले असताना अनेक लोक बाहेर फिरताना आढळत आहेत यावर आज कर्जत पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाई केली. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी स्वतः या ठिकाणी उभे राहून प्रत्येक दुचाकी व चारचाकी गाड्या तपासत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यावेळी गायकवाड यांनी कर्जत तालुक्यात सायंकाळी सात ते सकाळी सात यादरम्यान कोणीही कोणत्याही कारणास्तव फिरवू नये असे आव्हान केले आहे.