
खरवंडी ( प्रतिनिधी ):- नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील सोसायटी नंबर २ च्या चेअरमनपदी केशव शिंदे यांची तर व्हाय चेअरमन पदी सिध्देश्वर माळवदे याची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मुळा कारखान्याचे संचालक जबाजी पाटील फाटके, रावसाहेब भोगे, सोसायटीचे माजी चेअरमन आबासाहेब फाटके, जिल्हा बँकचे शाखाधिकारी सोनवणे साहेब, ज्ञानदेव भोगे, सोसायटीचे सचिव आदमाने भाऊसाहेब, सोसायटी चे कर्मचारी जवादे, राहुल बेल्हेकर आदी उपस्थित होते. यावेळी नुतन चेअरमन व व्हायचेअरमन याचा सत्कार मुळा कारखान्याचे संचालक जबाजी पाटील फाटके याच्या हस्ते करण्यात आला.