डहाणू. (विशेष प्रतिनिधी) :– मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोलेंकडून 7000 खलाश्यांना धीर देण्यात यश आले आहे.
10 ते 15 हजार खलाशी रोजगारानिमित्त गुजरातमध्ये जात असतो. त्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी पालघर जिल्हाधिकारी, डहाणू प्रांत अधिकारी आणि डहाणू व तलासरी तहसीलदार यांच्या समवेत बैठकी झाली. त्यात तलासरी पंचायत समितीचे सभापती कॉ. नंदू हाडळ, उपसभापती कॉ. राजेश खरपडे, माकपचे जिल्हा कमिटी सदस्य चंद्रकांत घोरखाना हे हजर होते. या बैठकीत मागणी करण्यात आली की, हा वर्ग रोजगाराच्या निमित्ताने गुजरात मध्ये गेला आहे, त्यासाठी गुजरात प्रशासनाशी चर्चा करावी की, हा 10 ते 15 हजार खलाशी बोटीवर काम करतो आणि त्याची काम करण्याची वेळ संपलेली आहे. आता त्यांना घरी यायचे आहे. पण लॉकडाऊन मुळे ते अडकलेले आहेत. तर त्यांची गुजरात प्रशासनाने पूर्णतः जवाबदारी घेऊन लॉकडाऊन असेपर्यंत राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. असे जर गुजरात सरकार करत नसेल तर त्या सर्व खलाश्यांना महाराष्ट्र सरकारने राज्यात आणण्याची सोय करावी, अशा प्रकारची मागणी कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली. 10 ते 15 हजार लोक हे डहाणू आणि तलासरी मधून रोजगारासाठी गुजरात मध्ये जातात. परंतु, या लॉकडाऊन मुळे त्यांची परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे. त्या दरम्यान गुजरात सरकारने या 10 ते 15 हजार खलाश्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे. पण, ती होत नाही आहे. त्यामुळे शेवटी येथील परिस्थितीला कंटाळून त्यांनी स्वतःहून निर्णय घेऊन ते बोटीने डहाणूच्या बंदरावर पोहचले असता त्यांना आधार देण्यासाठी डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले पोहचले. त्यांना सर्व ती मदत करण्याचे त्यांनी वचन दिले. उर्वरित खलाशांचा प्रश्न सोडविण्यासाठी सुद्धा कॉ. विनोद निकोले प्रयत्नशील आहेत. सर्व खलाश्यांना हातावर ‘ होम कोरोंटाईन ‘ चे शिक्के मारून त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देऊन सोडण्यात आले. तपासणी करूनच जाण्यासाठी पोलीस सर्व खबरदारी घेत आहेत.
दरम्यान सर्व खलाश्यांची ची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालय डहाणू कडून करण्यात आले. यावेळी आमदार विनोद निकोले, सभापती नंदु हाडळ, उपसभापती राजेश खरपडे, कॉ. अनिल झिरवा, कॉ. चंद्रकांत गोरखना, कॉ. धनेश आक्रे, रशित भाई व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.