कडा( प्रतिनिधी ):- केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी *दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत* ग्रामीण भागातील युवक युवतींना नोकरीची संधी देणारे प्रशिक्षण *गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कडा* येथे सुरू होत आहे. ग्रामीण भागातील युवक ,युवतींना योग्य प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी मिळावी यासाठी *”दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना”* सुरू करण्यात आली आहे. कडा येथे या योजनेतून नोकरीची हमी देणारा आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि औषध निर्माण सहाय्यक (इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन अँड फार्मसी असिस्टंट) अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी किमान पात्रता बारावी उत्तीर्ण कोणतीही शाखा वय 18 ते 35 वर्ष आणि उमेदवार हा/ही बीड जिल्ह्यातील रहिवासी असावा हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा असलेला संपूर्णतः निवासी असा आहे. यात पात्र उमेदवारांचा संपूर्ण खर्च केंद्र आणि राज्य सरकार करणार आहे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर योग्य वेतनाची नोकरी देखील मिळवून देण्याची सहकार्य केले जाईल. *गांधी चॅरिटेबल ट्रस्ट ने* या अभ्यासक्रमासाठी आवश्यक अशी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी त्वरीत आपला प्रवेश निश्चित करावा.
सुविधा:-
१) विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा.
२) वातानुकूलित वर्ग अद्ययावत संगणक प्रयोगशाळा.
३) प्रशिक्षित शिक्षक, टॅब आणि प्रोजेक्टर आधारित प्रशिक्षण.
४) वैद्यकीय प्रत्यक्षिक प्रयोगशाळा, RO प्युरीफाईड पिण्याचे पाणी.
*प्रशिक्षण केंद्र:- गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, गांधी हॉस्पिटल अँड आय सी यू सेंटर, नगर-बीड रोड, कडा ता- आष्टी , जिल्हा- बीड. पिन-४१४२०२.*
संपर्क:- ऑफिस- ८४२१०८१५०५, राम गोंदकर- ९४०३४९५४७७, शुभम पाथरकर- ८९९९६०५८५८.