
माका ( आदिनाथ म्हस्के ):- मुळा एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्याबाई होळकर माध्य.व उच्च मा. विद्यालयात मातापुजनाचा
अनोखा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यस्थानी सौ.प्रतिक्षाताई दत्तात्रय मुंगसे होत्या.”विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मार्गक्रमण करत असतांना आई आपल्यासाठी जे सोसते त्याचे सदैव स्मरण ठेवावे.
आई म्हणजे जन्माची शिदोरी.” असे प्रतिपादन त्यांनी केले.व या उपक्रमासाठी विद्यालयाचे कौतुक केले.
कार्यक्रमाची अध्यक्षीय सुचना श्री.काळे सर यांनी केली.,श्री.शिदे आर.एस. सर यांनी अनुमोदन दिले.प्रास्ताविक श्री.शेटे ए.डी.सर यांनी केले.कार्यक्रमा प्रसंगी सौ.कुटे वैशाली,सोनवणे मंगल,गडाख वैशाली,मुंगसे अनिता,तिडके सविता,कुलट मुक्ता,गायकवाड बबबाई,नांगरे लता,ज्योती नजन,कोकरे रूक्मिणी,साबळे कल्पना,ससाणे द्वारकाबाई.
या मातापालकांचे विद्यार्थिंनीनी औक्षण करून पुजन केले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.गायकवाड एस.के.सर यांनी उपस्थित मातांचे स्वागत केले.”भारतीय संस्कृतीत आईचे महत्व अधोरेखित केले आहे.आ़ईचे संस्कार,शिक्षकांचे संस्कार जीवनात नेहमीच उपयुक्त ठरतील”असे प्रतिपादन त्यांनी केले.लताताई नांगरे व प्रा.अरविंद गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. श्री.भुजबळ सरांनी आभार मानले.श्री.शेख यु.एम.सरांनी सुत्रसंचालन केले.
या प्रसंगी शिक्षक,शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी ,शिक्षणप्रेमी माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.