कोरोनाच्या संकटावर मात करत द्राक्षबाग शेतकऱ्यांनी काढला सरळ मार्ग ; शेतकरी ते ग्राहक थेटसेवा देत घरपोहच ऑनलाईन द्राक्ष विक्री !

 

नेवासा ( प्रतिनिधी ):- राज्यात कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू झाल्याने रस्त्यावर सन्नाटा पसरला आहे.अत्यावश्यक व जिवनावश्यक सुविधा सुरु रहात आसल्या तरी पोलिस वाहनांचे सायरन अर्ध्या एक तासाला वाजत आसल्यामुळे नागरीक घराबाहेर पडत नाहीत.त्यामुळे अर्थव्यवस्था पुर्ण कोलमडली आसतांनाच श्रीरामपूर तालूक्यातील वाकडी येथील इयत्ता बारावी शिक्षण घेतलेल्या प्रगतशिल शेतकरी दत्ताञय लांडे व सुनिल लांडे बंधूनी संचारबंदी काळ्यात आपल्या शेतातील द्राक्ष थेट शेतकरी ते ग्राहक अशी अभिनव योजना आखून योग्य नियोजनामुळे संचारबंदीच्या काळातही भरउन्हाळ्यात चवदार द्राक्षाची ‘चव’ चाखण्याची घरपोहच ऑनलाईन सेवा पुरविली जात आसल्याने लांडे बंधूच्या व्यावसायिक नियोजनाचे मोठे कौतूक होतांना दिसून येत आहे.
वाकडी तालूका श्रीरामपूर येथील लांडे बंधूची १५ एकर द्राक्ष बाग कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेली आसतांना कोरोनाच्या संकटावर नामी शक्कल लढवून त्यांनी शेतकरी ते ग्राहक अशी ऑनलाईन थेट सेवा सुरु करुन देशावर आलेल्या संकटाचा सामना उत्कृष्ठ नियोजन करुन ऑनलाईन द्राक्ष विकण्याचा खुष्कीचा मार्ग शोधत थेट व्हॉट्स अॅप व दुरध्वध्नीव्दारे द्राक्ष बुक करुन हा माल जिल्ह्यातील कोपरगांव, श्रीरामपूर, राहूरी, नेवासा, शेवगांव तालूक्यात द्राक्ष विक्री करत आहेत. कडाक्याच्या उन्हात दृष्काळात… आपलाच तेरावा… होवू न देता.योग्य नियोजनामुळे कोरोनाच्या महाभंयकर संकटातही द्राक्ष विक्री करुन आलेल्या संकटाला न डगमगता कणखर भूमिका घेतली आहे.त्यामुळे लांडे बंधूचा आदर्श संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा मार्गदर्शक ठरणारा आहे.
कोरोनाच्या महाभंकर संकटामुळे लॉकडाऊन आसल्याने बाजारपेठा पुर्ण ठप्प झाल्या रहदारीही बंद झाली. तसेच आयात – निर्यात थांबल्याने व्यापारीच शेतकऱ्यांचे द्राक्षे विकत घेत नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारातही द्राक्ष विकली जात नसल्याने शेतकरी मोठा अडचणीत आलेला होता.लाखो रुपयांचे अर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे होत आसतांना नाशिक व नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या उत्तरेच्या भागत द्राक्ष उत्पादक शेतकरी सर्वाधिक आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागात द्राक्ष पिके सहसा घेत नसल्याने या भागात द्राक्षे विक्रीला मोठी संधी आहे हे पारखून लांडे बंधूनी ही बाजारपेठ निवडली आणि ते यशस्वीही झाले आहे.
शेतकरी ते ग्राहक थेट सेवा पुरविली जात आसल्याने मधल्या मध्ये व्यापाऱ्यांचा ‘मलीदा’ नष्ट झाल्यामुळे माफक दरात भरउन्हाळ्यात लांडे बधूंची चवदार द्राक्षांची चव चाखण्यासाठी ग्राहकांना मिळत आसल्याने त्यांना द्राक्ष विक्रीली ऑनलाईन मोठा प्रतिसाद मिळत आसल्याची माहीती यावेळी लांडे बंधूंनी दिली.

कोरोनामुळे माणूस लवकर नवख्या माणसाच्या संपर्कात येत नाही सुशिक्षित मंडळी द्राक्ष खेरेदी करतांना काय स्वच्छता आहे.ही पाहणी केल्यावरच खरेदी करते.त्यामुळे लांडे बंधूनी चारचाकी वाहनातून चार किलो,पाच किलो द्राक्ष पॅकिंग करतांना बॉक्समध्येच पॅक केले आहे. द्राक्ष विक्री करतांना तोंडाला मास्क हातात हँण्डग्लोज अशी खबरदारीही ते घेत आसल्याने त्यांच्या द्राक्षाला बुकींगसाठी मोठी मागणी वाढली आहे.

द्राक्ष विक्री करतांना त्यांनी भ्रमनध्वनी क्रमांक 7741038184 / 9518746811 या क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क साधल्यास व्हॉटस् अॅप किंवा फोनवर बुकींग करुन घरपोहच द्राक्ष विक्री केली जात आसल्याने संचारबंदीच्या काळ्यात भर उन्हाळ्यात द्राक्षाची ‘चव’ चाखण्यासाठी ग्राहक सेवेचा आनंद घेतात व संकटावरही मात करता येते असे सुनिल लांडे यांनी प्रस्तृत प्रतिनिधीशी बोलतांना स्पष्ट केले.

Check Also

म. फुले यांची जयंती घरातच साजरी करून ज्ञानज्याोत पेटूयात…

🔊 Listen to this एकोणिसाव्या शतकात ज्ञानाची ज्योत तेवणाऱ्या, प्रतिगामी विचाराला मूठमाती देणा-या, भारताचे राष्ट्रीयत्व …