श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगरचा वाडिया पार्क येथे जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.१४वर्षे खालील मुलीचा संघाचे श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या श्रीराम अकॅडमी ने अंतिम सामन्यात त्रिमूर्ती नेवासा संघाचा २५-२२ व २५-१८ ने पराभव करून जिल्हा विजयतेपद पटकावले.
व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री नितिन बलराज यांचा कुशल मार्गदर्शन खाली खेळणाऱ्या श्रीराम अकॅडमीने पहिल्या सामन्यात शेवगाव तालुकाचा पराभव केला. त्यानंतर संघाने श्रीगोंदा, कोपरगाव चा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
श्रीराम अकॅडमी संघाकडून कुमारी प्रेरणा दुधाले,कु कार्तिकी बोरावके,कु तनिष्का काटकर,कु श्रेया डावखर व सुष्टी आठरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघाचे श्रीरामपूर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामसेठ टेकावडे,प्राचार्या श्री सौ जयश्री पोटघन,सौ मुडदा मॅडम,श्री बाळासाहेब ओझा व श्रीराम अकॅडमीचे सर्व शिक्षक वृदनी अभिनंदन केले व पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.