
अहमदनगर (प्रतिनिधी):- नवले आर्टस् थ्री डि एक्सटेरियर व इंटिरियर प्लॅन या ऑफिसच्या तिसऱ्या शाखेचे उदघाटन सावेडी येथे हायकोर्ट वकील अॅड .श्री.नंदलालजी जोशी (बन्सी महाराज) तसेच कोल्हार येथील उद्योजक श्री.राजेंद्र पाटील खर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. अल्पावधीतच अहमदनगर जिल्ह्यामध्ये थ्री डी प्लॅनद्वारे विविध आकर्षक वास्तू निर्माण करणारे आशुतोष नवले यांनी आपल्या कार्याचे सर्व श्रेय आपल्या आई वडिलांना दिले.त्यांचे वडील विकास नवले वांबोरी येथील रहिवासी असून,आई प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. पहिली शाखा वांबोरी व दुसरी शाखा पुण्यात यशस्वीपणे कार्यरत असून.अहमदनगर मध्ये शाखा स्थापन केल्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी अरे व्वा ट्रॅव्हल्स कंपनीचे सी.एम.डी.प्राध्यापक गणेश इंगळे, पी.एस.आय.पवन सुपणार , पी.एस.आय.सतीश शिरसाठ,आर्यन स्कुलच्या मुख्यध्यापिका सौ.वर्षा इंगळे व नगरमधील सर्व मान्यवर उपस्तिथीत होते.