
नेवासा ( काकासाहेब नरवणे ):- सामाजिक बांधिलकी म्हणुन गंगामाई साखर कारखान्याचे चेअरमन मा. पद्माकर मुळे साहेब व कार्यकारी संचालक रंजित भैया मुळे यांनी
गंगामाई साखर कारखान्यात गंगामाई सॅनिटाॅल
या नावाने सॅनिटायझर तयार केले व कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहुन यास रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करून उत्पादन चालु केले. व परिसरातील शेतकरी ,नागरीक ,यांना सवलती च्या दारामध्ये उत्तम प्रतीचे सॅनिटायझर उपलब्ध करून दिले.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना साथीच्या आजारावर रुग्णांची संख्या दिवसांन दिवस झपाटयाने वाढत आसताना .अहमदनगर जिल्ह्यातील बुथ हाॅसपिटल ,जिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय ,
ग्रामपंचायत ,पत्रकार ,तसेच अत्यावश्यक सेवेत काम करनारे कर्मचारी ई.ना सॅनिटायझर चे मोफत वाटप करण्यात आले.
तसेच गंगामाई साखर कारखाना परीसरातील शेवगाव ,पाथर्डी ,नेवासा ,गंगापुर ,पैठण ई . तालुक्यातील 125 ग्रामपंचायतीला दैनंदिन वापरासाठी 6 ते 7 लिटर सॅनिटायझरचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. याच बरोबर ईतर नागरिक व शेतकरी यांना
सॅनिटायझर पाहिजे असल्यास 1 लि. बोटल 300 ते 400 रू.पर्यत अल्प दरात उत्तम प्रतिचे सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी हि गंगामाई साखर कारखान्याने
परिसरातील तालुक्यातील शेतक-यां साठी जलसंधारण ,वृक्षारोपण ,कच्चे रस्ते दुरूस्ती करून सामाजिक बांधिलकी जपत असे नविन उपक्रम राबवित आहे. अशा गंगामाई साखर कारखान्याच्यय उपक्रमाचे जिल्ह्यातूू कैैैतूक होत आहे.