Breaking News

तरुणाईच्या पुढाकाराने 500 वाटसरूना पुरवले जाते जेवण ; नेवश्यातील गोल्डन ग्रुपच्या वतीने वडाळा व प्रवरासंगम येथे सुरू आहे अन्नदान

खरवंडी ( प्रतिनिधी ) :- प्रशासनाने काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल केल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यापासून गावी जाऊ न शकलेले नागरिक वाहन सुविधा नसल्याने मजल दरमजल करत पायी गावाकडे निघाले आहेत यात लहान मुले,वृद्ध,तरुण ,स्रिया आदींचा समावेश आहे.गाव जवळ करण्याच्या आशेने ही मंडळी दररोज नगर औरंगाबाद राज्यमार्गावरून शेकडोच्या संख्येने मार्गक्रमण करत आहेत.या नागरिकांना रात्री विसाव्यासाठी नेवासा प्रशासनाने वडाळा व प्रवरासंगम येथील मंगलकार्यालयात निवाऱ्याची व्यवस्था केली आहे परंतु येथे मुक्कामी असलेल्या सर्व नागरिकांना जेवणाची आवश्यकता व गरज आहे ही अडचण ओळखून नेहमी सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या गोल्डन ग्रुप नेवश्याच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत दररोज रात्री या दोन्ही ठिकाणी उपस्थित असलेल्या 500 वाटसरूना स्व:यस्फुर्तीने यश ग्रुप सोनई यांचेकडून प्रेरणा घेत गेल्या 4 दिवसापासून जेवण देण्यास सुरुवात केली आहे.ग्रुपचे सर्व सदस्य सोशल डिस्टन्स पाळत हे जेवण या नागरिकांना पोहोच करून त्यांना पंगतीद्वारे जेवू घालतात.या जेवणात 1 भाजी 3 पोळ्या व मसाले भाताचा समावेश असतो.घर सोडून बाहेर असलेल्या व भीतीने हवालदिल झालेल्या नागरिकांना यामुळे मायेचा आधार मिळतो.संकटे येतात व जातात यात माणूसपण जिवंत राहिले पाहिजे या भावनेतून आम्ही सर्व मित्र परिवार हा कर्तव्य भावनेतून उपक्रम राबवतो आहेत आपणही आपल्या परीने गरजू नागरिकांना मदत करून या संकटकाळातही माणूसपण अबाधित आहे हे आपण कृतीतून दाखवून द्यावे असे आवाहन गोल्डन ग्रुप सदस्यांनी केले आहे.पतसंस्था संकलन करणाऱ्या पासून ते व्यापार ,नोकरी करणारे तरुण या ग्रुपच्या कामात आनंदाने आर्थिक भार उचलत आहेत.सुनील धायजे, विनायक नळकांडे,अभय गुगळे,सुधीर बोरकर,नितीन खंडाळे, सुनील साळुंके, सागर गांधी,नितीन ढवळे,वैभव नहार,मनोज मुनोत,प्रशांत कानडे,आशिष कावरे,कमलेश जगताप,रुपेश विखोना,जितेंद्र सचदेव,सुधीर तलवार,दिलीप गीते,महेश मापारी,अभिजित मापारी, पंकज जेधे,रमेश शिंदे,बाळू चोपडा,प्रसाद पल्लोड,अमृत कोठारी हे सदस्य आपल्या परीने या कामात हातभार लावत आहेत.नंदू यादव व सत्तू महाराज हे खाद्य पदार्थ तयार करण्यास सहकार्य करतात.तर डॉ लक्ष्मण खंडाळे नेवासा यांनी या सदस्यांना हे जेवण बनवण्यासाठी स्वतः लक्ष्मी मंगल कार्यालय व भांडे मोफत दिले आहेत.

आज आपण सर्व जण आपल्या घरी असल्याने सुखी आहोत परंतु आज आपलेच बांधव वाहाने नसल्याने पायी उपाशीपोटी घरी जात आहेत हे पाहून सामाजिक जाणिवेतून आम्ही सर्व ग्रुप सदस्य हे काम करत आहोत या बांधवांना जेऊ घातल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख नाहीसे झाल्याने दुसऱ्या दिवशी कामास हुरूप येतो जोपर्यत शक्य आहे तोपर्यत हे अन्नदान आम्ही अखंडपणे सुरू ठेवणार आहोत.आपणही आपल्या परीने गरजुना मदत करावी आपले कर्तव्य संकटकाळी पार पडावे.
विनायक नळकांडे गोल्डन ग्रुप नेवासा.

Check Also

युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

🔊 Listen to this कर्जत (प्रतिनिधी):- राज्यातील रक्ताचा तुटवडा काँग्रेसचे युवक कार्यकर्ते भरून काढतील असे …