Breaking News

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्यावतीने नगरपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, आणि होमगार्डस् यांना मास्क,सेनिटाइजर आणि पोषक आहाराचे वितरण

 

कर्जत ( प्रतिनिधी ) :- राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्तव्य बाजावणारे नगरपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, आणि होमगार्डस् यांना मास्क,सेनिटाइजर आणि पोषक आहाराचे वितरण नगरसेवक सचिन घुले आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्याचे वनमंत्री संजय राठोड़,जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेने आणि माजी जि.प.सदस्य प्रवीण घुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी कर्जत येथील नगरपंचायतमध्ये हुतात्मा स्तंभाजवळ नगरपंचायतचे कर्मचारी, सफाई कामगार, आणि होमगार्ड यांना यावेळी मास्क, सॅनिटाइजर आणि पोषक आहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन घुले, भास्कर भैलुमे,भाऊसाहेब तोरडमल, उमेश गलांडे आदि उपस्थित होते. यावेळी सर्व नगरपंचायत कर्मचारी आणि माजी सैनिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत उपस्थितांना धन्यवाद दिले. यापूर्वी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्यावतीने आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि कोरोना परिस्थितीमध्ये जीवावर उदार होत वार्तांकन करणाऱ्या सर्व पत्रकारांना मास्क, सॅनिटायजर आणि पोषक आहाराचे वितरण करण्यात आले होते. यासह वडगाव तनपुरा येथे गरजवंत कुटुंबाना जीवणावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले होते.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर कर्जत शहर आणि तालुक्यात कर्जत नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार,आरोग्य कर्मचारी इ. कोरोना परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावणारे स्वयंसेवक आणि होमगार्ड यांनीही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले असून त्यांच्यासाठी सामाजिक कर्तव्य म्हणून हे साहित्य वाटप केले आहे.
महेश तनपुरे,
अध्यक्ष-राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण,कर्जत

Check Also

तमीजबी शौकत शहा यांचे निधन

🔊 Listen to this   कुकाणा ( प्रतिनिधी ) :- कुकाणा माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील …