सोनई ( प्रतिनिधी ) :- संपूर्ण देशात सतरा मे पर्यंत लॉकडाउन जाहीर झाला असला तरी सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्याने व्यवसायांना सशर्त चालु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन शिथिल झाल्याने सोनईत नागरिकांनी एकच गर्दी करून शासनाच्या सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने ठिकठिकाणी वर्दळ दिसत होती.
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वत्र शांतता होती. दरम्यान पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सोनई परिसरातील बारा वाड्या व परिसरातील गावासाठी मोठी बाजार पेठ आहे. सोनईमध्ये राष्ट्रीकृत,-सहकारी बॅका, पतसंस्था, कृषी सेवा केंद्र ,
पशुखाद्यदुकाने, मोटार मेकॅनिक, सुतार,-वेल्डींग,
किराणा दुकान, मिठाईचे दुकान, कापड ,जनरल स्टोअर्स तसेच अनेक छोटी मोठी दुकाने आहे.
लॉकडाऊन मध्ये शिथितला देताच अनेक नागरिक पेठेत खरेदीसाठी तर काही विनाकारण बाहेर पडत आहे.मात्र अनेक जण नियम न पाळीता विनाकारण बाहेर चक्कर मारणारे अजुनही कमी झालेले दिसुन येत नाही. यामुळे सोनईत गर्दीच गर्दी होत असल्यामुळे यांना कोणी आवरारे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सोनईमध्ये अनेक पदाधिकारी, राजकीय व्यक्ती ,
स्वतःला नेते म्हणविणा-यांची विविध व्यवसायांची दुकाने आहे. ते व्यावसाय करण्यात मग्न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची काळजी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या पदाधिकारी, राजकीय व्यक्ती यांच्याकडुन अनेक नियमांचे उल्लघंन होत आहे. याबाबत मात्र ग्रामपंचायत प्रशासनाची “हाताची घडी तोंडावर बोट” आहे.
लॉकडाऊन मध्ये सर्वानी नियम पाळले. मात्र
शिथिलता दिल्यामुळे नियमांकडे कानाडोळा होत असल्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. याकडे त्वरित लक्ष न दिल्यास भविष्यात मोठा धोका होऊ शकतो.
Check Also
युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
🔊 Listen to this कर्जत (प्रतिनिधी):- राज्यातील रक्ताचा तुटवडा काँग्रेसचे युवक कार्यकर्ते भरून काढतील असे …