चर्च ऑफ जीजस क्रॉईस्टचे धर्मगुरु सुर्याब्रदर यांच्यावतीने गरजूंना किराणा साहित्याते वाटप !

 

नेवासा ( प्रतिनिधी ):- नेवासा फाटा येथील चर्च ऑफ जीजस क्राईस्टचे धर्मगुरू रेव्ह सूर्या ब्रदर व त्यांच्या सौभाग्यवती सौ मनीषाताई यांनी संभाजीनगर येथील १०० गरीब व गरजू कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप केले, यामध्ये श्री अनिल कुसळकर व दिगंबर लष्करे यांनी त्यांना मोलाचे विशेष सहकार्य केले.
बायबलमधील प्रभू येशूची जी शिकवण आहे, शेजाऱ्यावर प्रेम करा आणि गरजवंताला द्या ! त्या शिकवणी प्रमाने धर्मगुरू रेव्ह. सुर्या ब्रदर व त्यांच्या परिवाराने मागील महिन्यातही १०० गरजू कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप केले होते, आणि शनिवार (दि.९) रोजी १६० गरीब व गरजू परिवारातील कुटूंबाना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलतांना धर्मगुरु रेव्ह सूर्या ब्रदर म्हणाले की, बायबलमध्ये प्रभू येशूची जी शिकवण आहे,शेजाऱ्यांवर प्रेम करा ही शिकवण आम्ही प्रत्यक्षात आत्मसाथ करुन गोरगरीबांना कोरोनाच्या संकटात हातावर पोट आसणाऱ्या गरजू कुटूंबियांना किराणा साहित्याची वाटप करुन साध्य केल्याचे यावेळी सुर्या ब्रदर यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटाच्या काळात गरीब व गरजू लोकांना किराणा साहित्याचे वाटप करतांना घाई व गर्दी होणार नाही याची खबरदारी घेवून सुर्या ब्रदर व त्यांचे सहकारी अनिल कुसळकर यांनी विशेष लक्ष केंद्रीत करुन सोशल डिस्टन्स ठेवून शिस्तीत वाटप झाल्याने या मदतीची चर्चा परिसरात चांगलीच चर्चिली जात होती.

Check Also

माका महाविद्यालयाकडून नागरिकांना मास्कचे वाटप

🔊 Listen to this   माका (आदिनाथ म्हस्के ) :- सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत सावित्रीबाई …