नेवासा ( प्रतिनिधी ) :- अहमदनगर जिल्हातील सर्व वदारूची दुकाने बंदच ठेवा अशी मागणी जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नवले म्हणाले की,अहमदनगर जिल्हात दोन दिवसांपासून दारूची दुकाने सुरू झाली आहेत. तेथे मजूरवर्ग, सर्वसाधारण वर्ग रांगेमध्ये उभे आहेत. रेशन दुकान व जीवनाआक्शक वस्तुंच्या दुकानामध्ये गर्दी नाही येवढी दारूच्या दुकानासमोर गर्दी असुन लांबच्या लांब रांगा आहेत.यामुळे पोलीस यंत्रणेवर खूप ताण निर्माण होत आहे. तसेच या मद्यपींमुळे त्यांचे कौटुंबीक स्वास्थ व परीसरातील वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे हे कौटूंबीक अर्थव्यवस्थेला कोरोणाच्या काळात न परवडणारे आहे. सर्वबाबींचा विचार करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जणतेचे सर्वदृष्टया आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने बंदच राहवे मागणी केली आहे.