पालघर / डहाणू. (प्रतिनिधी) :– डहाणू येथील भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय येथे सोशल डिस्टन्स चा फज्जा होत असल्याचे आढळून आले आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात विविध पक्षाचे तसेच पक्षांतर्गत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय असते. कोरोना कोविड 19 या महाभयानक विषाणू ने संपूर्ण जगात, देशात सहीत राज्यात थैमान घातले आहे. प्रत्येक नागरिक आपल्या परीने आवश्यक तेवढे पयत्नाने या विषाणू शी मुकाबला करत आहे. त्यात शासन, प्रशासन, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, लोकप्रतिनिधी एकनिष्ठेने कोरोना विषाणू शी दोन हात करण्याच्या पुरेपुर प्रयत्न करत आहेत. त्यात केंद्र सरकार, राज्य सरकारने काही नियमावली आखली आहे त्यानुसार दोन व्यक्तींमध्ये काही अंतर असणे आवश्यक असून त्याचबरोबर माक्स परिधान करणे आवश्यक आहे. परंतू भारतीय जनता पक्षाचे डहाणू विधानसभा पराभूत उमेदवार पास्कल धनारे यांच्या जनसंपर्क कार्यालय वर वेगळेच चित्र दिसत आहे. यात अक्षरशः सोशल डिस्टन्स फज्जा चा होत असून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
डहाणू भाजप कार्यालयावर सोशल डिस्टन्स च्या नियमांचे पालन न करता राेज जमाव एकत्र येत आहे याकडे प्रशानाकडून डाेळे झाक हाेताना दिसते आहे. सामान्यांवर नागरिकांवर १४४ व १८८ कलमा अंतर्गत कारवाई होते. मग भाजप पक्ष कार्यालयात एवढी गर्दी करणाऱ्या कार्यकाऱ्यांवर व नेते यांच्यावर कार्यवाही होणार की नाही कायदा सर्वांना समान आहे हे कदाचित प्रशासकीय व्यवस्थेला याचा विसर पडला असावा अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
Check Also
तमीजबी शौकत शहा यांचे निधन
🔊 Listen to this कुकाणा ( प्रतिनिधी ) :- कुकाणा माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील …