सोनई ,( प्रतिनिधी ) :- कोरोना प्रतिबंधासाठी विशेष आरोग्य सेवा दिल्याबद्दल किडस किंगडम विद्यालयाच्या वतीने वडाळाबहिरोबा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील दोन आरोग्य सेविकांचा सन्मान करुन जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला आहे.
विद्यालयाच्या सभागृहात प्राचार्या किर्ती बंग व अन्नपुर्णा बंग यांनी आरोग्य उपकेंद्रांतर्गत कोरोना संसर्ग प्रतिबंधचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल परिचारिका सोनाली न्यालपेल्ली-पोता व वनीता काळे-नवगिरे यांचा साडी-चोळी,मिठाई व पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.यावेळी संस्थेचे सचिव सचीन बंग,विनायक दरंदले, राणी मोटे,अश्विनी अमोलिक,जयश्री नागे उपस्थित होते.
वडाळाबहिरोबा येथील आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून परिचारिका सोनाली न्यालपेल्ली व वनीता काळे सह आरोग्य पथकाने प्रबोधन,रस्त्यावरुन पायी जात असलेल्या वाटसरुंना आरोग्यसेवा,लसीकरण व
गरोदर मातांना औषधे दिली.यवतमाळ येथील महिलेची रस्त्याच्या बाजूला अवघडलेली प्रसूती केली.
या कार्याचा गौरव म्हणून सत्कार केल्याचे सौ.बंग यांनी सांगितले. आम्ही आमची जबाबदारी पार पाडत असुन
आज झालेला सन्मान आमचा नसून आरोग्य कार्याचा आहे.असे न्यालपेल्ली यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
Check Also
शुभमंगल सावधान ; ना बाजा, ना गाजावाज्या
🔊 Listen to this कर्जत ( प्रतिनिधी ) :- सुरक्षित अंतर आणि मोजक्या घरच्या …