Breaking News

धक्कादायक ; शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

बीड ( प्रतिनिधी ) :- कोरोना व्हायरसच्या महासंकटात एकीकडे माणस एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. एकमेकांना मदतीचा हात देत आधार देत असतानाच दुसरीकडे बीडमध्ये मात्र वादातून तिहेरी हत्याकांड झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. तिथे झालेल्या वादातून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मांगवडगाव इथे घडली असून तिहेरी हत्येनं बीड हादरलं आहे.
मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासणी केली. जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल तर 3 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे.
एकीकडे कोरोना व्हायरसमुळे वाद बाजूला ठेवून लोक मदत करत असल्याचं दिसत आहे तर बीडमध्ये रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Check Also

शनिजयंतीच्या निमित्ताने शनी मंदिरात कायद्याचा भंग? कारवाईची विश्वस्तांची मागणी : चौकशी सुरू

🔊 Listen to this   शनिशिंगणापूर (प्रतिनिधी) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साथरोग प्रतिबंधक कायदा …