नेवासा ( नवनाथ जाधव ) :- नेवासा नगरपंचायतीने शहरातील डावे-उजवे बाजुच्या दुकानांना खुले करून व्यवसाय करण्याची परवानगी दिल्यानंतर आज सकाळी शहरातील काही व्यवसायिकांनी आपले दुकाने खुली करून दिली आहे. यामुळे तब्बल ५२ दिवसानंतर शहरात बाजारपेठ फुलली आहे. आज सकाळी नऊ वाजता शहरातील काही व्यवसायिकांनी मोठ्या उत्साहात दुकाने उघडली.५२ दिवस दुकाने बंद असल्यामुळे दुकानाची साफसफाई करण्यातच वेळ निघून गेला. आता थोड्याफार प्रमाणात व्यवसायाला सुरुवात झाली असली तरी अनेक व्यवसायिकांनी दुकाने उघडण्यास नापसंती दाखवल्याचे दिसून येत आहे नेवासा शहरातील नगरपंचायत चौक ते सेटल बँकपर्यंत डावी बाजू, प्रवरापून ते खोलेरवर गणपती मदिर उजवी बाजू, नगरपंचायत चौक तै हेडगेवार चौक ते भराव गणपती चौक डावी बाजू, वाखरे चौक ते हेडोवार चौक त मुथ्था मेडिकल ते औदुंबर चौक डावी बाजू, या प्रमाणे दुकाने खुली झाली. सकाळी९ ते सायंकाळी ५ या वेळेतच दुकाने खुली राहणार आहे.
Check Also
युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
🔊 Listen to this कर्जत (प्रतिनिधी):- राज्यातील रक्ताचा तुटवडा काँग्रेसचे युवक कार्यकर्ते भरून काढतील असे …