
कर्जत ( प्रतिनिधी ):- कर्जत शहरातील रस्त्याचे विना परवानगी खोदकाम करणा-या ठेकेदारावर कारवाई करावी असे सार्वजणीक बांधकाम विभागाने लेखी पत्र पेालीस निरीक्षक कर्जत यांना दिले असून पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यावर काय निर्णय घेतात या कडे कर्जत शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
कर्जत शहरातील सर्वात मोठा व मुख्य आणि मोठया रहदारीचा असलेला बसस्थानक परीसरातील रस्ता केबल टाकण्यासाठी रात्रीच्या अंधारात तहसील कार्यालया पासून चैका पर्यंत खोदण्यात आला आहे. यामुळे चांगला रस्ता खराब झाला आहे . या रस्त्यावर डांबरीकरण माघील वर्षी करण्यात आले होते यामुळे शासनाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे चांगला रस्ता खोदल्यामुळे नागरीकांमध्ये नाराजी पसरली आहे काही वाहणांना देखील अपघात झाला आहे.
याची दखल सार्वजणीक बांधकाम विभागाने घेतली व त्यांनी 29 मे रोजी कर्जतचे पोलीस निरीक्षक यांना जा क्र 294 या क्रमांकाचे लेखी पत्र दिले आहे या पत्रामध्ये त्यांनी म्हणटले आहे कि, राज्यशासनाच्या महानेट योजने अंतर्गत तहसील कार्यालय ते कुळधरण रस्ता पर्यत दि 28 मे रोजी मध्यरात्री डांबरी धावपटटीचे खोदकाम करून केबल टाकली आहे यासाठी आमच्या विभागाची विना परवाणगी व कुठलीही चर्चा न करता रस्त्याचे व शासनाच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे तरी संबधीतावर आपल्या मार्फत कार्यवाही करण्यात यावी असे म्हणटले आहे
यामुळे आता पोलीस प्रशासन या कडे काय भूमीका घेते याकडे लक्ष लागले आहे कारण संबधीत ठेकेदाराने सार्वजनीक बांधकाम विभागाची मालकीचा रस्ता असताना तो त्यांची कोणतिही परावणगी न घेता खोदला कसा हा प्रश्न येथे निर्माण होतो या बाबत बांधकाम विभागाचे आधिकारी यांनी पत्रकारांना सागितले कि आम्ही त्यास हा मुख्य रस्ता खोदू नये असे स्पष्ट सांगितले होते किंवा या बाबत दुसरा पर्याय दिला होता मात्र तशा सुचना देवूनही त्यांनी आमच्या रस्त्याचे नुकसान केले आहे यामुळे त्याच्यावर पोलीस विभागाने गुन्हा दाखल करावा अशी आमची आपेक्षा आहे. या खोदकामासाठी ठेकेदार आम्हाला कोणाचीही परवागणी घेण्याची गरज नाही असे सांगत आहे असे पत्रकारांनी विचारणा केली असता यावर बांधकाम विभागाचे आधिकारी यांनी सांगितले कि, परवाणगी ही अशी नसते प्रत्येक परीसरात वेगळी परिस्थीती असते रस्त्यावर खोदकाम करताना त्यालाही नियम आहेत ते पाळवेच लागतता स्थानीक शासकीय कार्यालयांशी समन्वय करून खोदकाम करावे असेच निर्देश असतात, वनविभागाच्या हदीमध्ये खोदकाम करताना त्यांची स्वतंत्र परवाणगी आवश्यक असते मात्र हे मनमानी काीत आहेत यामुळेच आम्ही पोलीस विभगाला लेखी पत्र दिले आहे