
श्रीगोंदा ( प्रतिनिधी ):- बेलवंडी शिवारात लबडे वस्तीवरील बाळासाहेब सोन्याबापू लबडे यांच्या किचन च्या दरवाजाचा आतील कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने रोख एक लाख पंचवीस हजार रुपयांसह तेवढ्याच रकमेचे सोन्याचे दागिने असा दोन लाख पन्नास हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना 1 जून रोजी पहाटे घडली. बाळासाहेब लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबद पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, लबडे वस्तीवरील बाळासाहेब लबडे हे आपल्या कुटुंबासह घरात झोपले असताना पहाटेच्या सुमारास त्यांच्या किचन च्या दरवाजा च्या आतील बाजूचा कोंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने कटावनीच्या साहाय्याने तोडून किचनमध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेले एक लाख पंचवीस हजार रुपये रोख व तेवढ्याच रकमेचे सोन्याचे दागिने असा दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोर्ट्यांन्नी चोरून नेला याबाबत लबडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरून बेलवंडी पोलिसात भा. द. वि. कलम 457 , 380 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव ,पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास स .पो .नि.पी. के .बोराडे हे करीत आहेत.