
परंडा ( उपसंपादक सुरेश बागडे ):- चोरीच्या मोटार सायकल सह गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी ईश्वर सुरेश काळे, वय २२ वर्षे, रा खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर यास दि १४ जुलै रोजी परंडा तालुक्यातून चोरलेल्या मोटार सायकल सह ताब्यात घेतले .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की आरोपीने चोरलेल्या मोटार सायकल सह परंडा तालूक्यात आल्याची गोपणीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पथकाने सापळा लाऊन आरोपीस पकडले व मोटार सायकल विषयी चौकशी केली असता
मोटार सायकलच्या मालकी- ताबा या विषयी त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पथकाने त्या मोटार .सायकल च्या चासी- इंजीन क्रमांकावरुन माहिती काढली असता सदर मोटार सायकल बाबत जामखेड पोलीस ठाणे, येथे गुन्हा र.क्र. २८८/२०२० हा चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजले.
अरोपीस मोटारसायकल सह ताब्यात घेऊन उर्वरीत तपासकामी आरोपीस आंबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत तपासकामी अहमदनगर पोलीसांची मदत घेतली जाणार आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- काझी, पोलिस नाईक- शेळके, कुनाल दहीहांडे, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.