जगात जिची ओळख भारताची औधोगिक राजधानी म्हणून आहे.जिच्या प्रेमात लोक पढतात आणि एक वेळ तरी तिचे दर्शन घ्यावे हि इच्छा ठेवतात.संपूर्ण देशभरातून, देशविदेशातुन म्हणजेच जगभरातून लोक तिला पाह्ण्यासाठी येतात. ती हीच का ती मायानगरी, कोरोनाशी संघर्ष करतांना आज ती जगाच्या नकाशावर ठळकपणे गाजत आहे. ज्या मुंबईची मायानगरी म्हणून ओळखली जाते तीच काय ही मायानगरी?.
जरास फ्लॅश बॅक मध्ये गेल की, आठवतो तो माझा प्रथम दिवस, कामावर हजर झालेल्याचा आणि तो दिवस अरुणा शानबाग यांच्या कक्षातील कर्तव्याचा पहिला दिवस…
खर सांगू त्यांच्या रुममध्ये प्रवेश करण्याआधी डोक्या मध्ये प्रश्नाचे काहूर माजले होते, डोळ्यात वेगळीच
चमक होती.भीती पण वाटत होती आणि अरुणा शानबागला स्वत:च्या डोळ्यांनी पाहताच निशब्द झाले. सिस्टर इन्चार्ज यांची महत्वाची ओव्हर संपली होती आणि आता त्यांची घरी जाण्याची लगबग चालू होती पण डोकयात प्रश्नांचा भडिमार चालू होता.हीच का ती मुंबई …????.अरुणा शानबाग चा इतिहास माहिती असेलच?.
इतिहासात कित्येक वर्षात जे या मुंबापुरीने पाहिले नव्हते ते आज ही मायानगरी पाहत आहे.कोरोनामुळे लॉक डाऊन,बंद लोकल, सुनसान रस्ते, बंद सिनेमागृहे, नाट्यगृह, मॉल आणि बंद देवळे…
चालु आहे ती फक्त अत्यावश्यक सेवा. नेहमीप्रमाणे 24 तास रात्रन दिवस,अहोरात्र नेहमीप्रमाणेच कर्तव्य पार पाडत आहेत.ते डॉक्टर,नर्स,पालिका कर्मचारी, सफाई कामगार आणि पोलिस.मग अस काय नविन आणि वेगळ आहे जे या मायानगरीला माहिती नाही.
लाखो करोंडो लोकांनी खचाखच भरलेली ही मुंबई 50 दिवस झाले. काटेकोरपणे लॉकडाऊन पाळत आणि झेलत आहे.
रस्त्यावरती बी.एम.सी. बेस्ट, सफाई कामगार, आरोग्य विभागातील कामगार,कर्मचारी यांची लगभगच पहायला मिळणार. बीएमसी कर्मचारी यांची जिवाची पराकाष्टा चालु आहे कर्तव्यावर हजर राहण्यासाठी बेस्ट कर्मचारी हे आपल्या जीवाचे रान करुन ह्या सर्व हेल्थ केअर वर्कर यांना वेळेवर त्यांच्या कर्तव्यावर पोहचवत आहे आणि सफाई कामगार खरं तर यांनी आपल्या जिवाची बाजी लाऊन या कोरोना महामारी मध्ये तयार होणारा हजारो टन कचरा साफ करुन कचरा घेऊन जाण्याचे काम हे चतुर्थक्षेणी कामगार अगदी चोख पणे बजावत आहेत.
पूर्ण जग या कोरोनाच्या महामारीतून जात असताना अगदी 50 दिवस सगळ सुरळीत असताना अचानक एक व्हीडीवो वायरल होतो आणि कोणीतरी तो इलेक्ट्रॉनिक मिडिया मधून सगळीकडे पसरवत राहता आधी सायन चा व्हीडीवो मग के.ई.एम चा व्हीडीवो
काय तर म्हणे Dead Badies च्या बाजुलाच दिली जाते रुग्णांना ट्रिटमेंट आणि हा विदारक व्हीडीवो चित्र जगापुढे मांडण्याचा चांगला प्रयत्न ही झाला. खरच जगाला ही कळंल की, ज्या इटली, स्पेनची तुलना आपन करायला जातो ,त्या तुलनेत आपली हेल्थकेअर यंत्रणा नाही कुढेच नाही बसू शकत. आपली हेलथकेअर यंत्रणा, काही प्रमाणात सत्य आहे.पण व्हीडीवो
दाखवणारा पण खूपच चतुर म्हणावा लागेल. त्याने जमीनीवर पडलेल्या रुग्णापासून Pack dead Bodies पर्यंत सर्व प्रकारचे छायाचित्रण केले,पण याचं कक्षात 50 रुग्णांना सेवा पुरविणारे डॉक्टर किंवा नर्सेस किती आहेत हे नाही दाखवले?. इन्टरनल पॉलिटिक्स किंवा TRP साठी केलेला हा प्रकार असु शकतो. असो, यामुळे वास्तव्य जगाच्या समोर आले म्हणायचे कारण आज पर्यंत ही याच परिस्थितीत मध्ये केईएम चा कर्मचारी वर्ग काम करत असतो. पण आजपर्यंत इतक्या डिजासटर मध्ये कोणाला जाग आली नाही, परंतु ह्या महामारी मुळे लोकांना जाग आली खरी, पण प्रश्नांची सोडवणूक करण्याची कधी जाग येईल.देवास ठाऊकॽ.
माझ्या परिचारिका बहिणी व डॉक्टर वर्ग हे आपल्या परिवारापासून दुर राहत, दिवस रात्र एक करुन रुग्ण सेवा देत आहेत. तासनंतास प्रवास करुन कामावर हजर रहायचे, त्यात कित्येक गोष्टींचा तुटवडा, ना उत्तम जेवण, सगळीकडून जीवाची हेळसांड होत असताना आणि कित्येक जणींना संसर्ग झालेला असतानही ही सेवा अखंड आणि अविरत चालु आहे.
सायन मधील व्हायरल व्हिडिओ अन वास्तव हे आमच्या डॉक्टर बंधु आणि परिचारिका बहिणीने खूप उत्तम मांडले आहे. पण खरंच का त्या वायरल झालेल्या व्हीडीवो ला चोख प्रत्युतर देण्यासाठी दोन लेख पुरेसे आहेत काॽ
के.ई.एम. हे अगदी मध्यवर्ती ठिकाणी असणारे रुग्णालय, ज्याच्या आजुबाजुला झोपट्टपटी नसुन, त्याच्याच आजुबाजुला 6 ते 7 मोठी रुग्णालय आहेत.देशभरातून येथे रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात, केईएम मध्ये होणारे ऑपरेशन विदेशात बसून बघितले जातात. खरंच केइएम पाठवणार का त्यांचे रुग्ण इतर रुग्णालया मध्येॽ.कदापी नाही, उलट इथे येणारा रुग्ण 10 ठिकाणी फिरून आलेला असतो. शेवटी केईएम रुग्ण कुठे पाठवू शकत नाही.तो हक्कच नाही रुग्णालयाला, म्हणून रुग्णांना इथेच उपचार पुरवले जातात.
12 मार्च 1993 चा बॉम्बस्फोट , 11 जुलै 2006 चे सिरीयल सात बॉम्बस्फोट, 26 जुलैचा मुंबई मधील महापूर परिस्थिती असू दे प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या आणि मुंबईत येणा-या प्रत्येक आणिबाणीच्या काळात केईएम खंबीरपणे उभे होते आणि यापुढे ही खंबिरपणे उभे राहील.
जीव धोक्यात घालुन आज केईएम चा प्रत्येक कर्मचारी सेवा देत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दिल्या जाणा-या साधनांचा अभाव आणि त्यामुळे नर्सेसला होणारा संसर्ग आणि त्यातून उदभवणारी हेल्थ केअर वर्करची कसरत हे वास्तव आहे..
केईएम व्हिडीओ फुटेज मध्ये बॉडीस पॅक करुन ठेवलेला दिसून येतात म्हणजेच यात कर्मचा-यांची दिरंगाई किंवा कामचुकार पणा नाही दिसत… रुग्णाची डेथ प्रोसेस Body, म्हणजे हॉस्पिटल मध्ये रुग्णा बरोबर फॅमिली मेंबर नसताना त्यांना कळवने,पोलिसाना कळवने या ना अश्या विविधी गोष्टी कुठे हि न चुकता काटेकोर पणे पार पाडणे ही सुद्धा एक कसरतच आहे.
किती तरी चतुर्थक्षेणी कर्मचारी एकटे डेथ बॉडी ची संपुर्ण विळेवाट लावण्याची प्रक्रिया ही पुर्ण करत आहेत. नातेवाईकाशिवाय याच मात्र फुटेज कोणी व्हायरल करत नाहीत. का तर ते सेनसिबल आहेत म्हणून?
आणि हेअल्थ केअर वर्कर काय दुस-या गृहावरुन आले आहेत…
ही मुंबापुरी पावसाळ्यात तुबापुरी बनते तर या वैश्वीक महामारीमध्ये कोरोनापुरी झाली आहे. ही विदारक सत्य डोळ्यासमोर ठेऊन मुंबईकरांनी ही सरकार ला महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि या हेल्थकेअर वर्कर वरचा ताण कमी करुन भविष्यात इंटरनल पॉलिटिक्स साठी किंवा कुठल्याही TRP साठी असे प्रकार घडू देऊ नयेत. हेल्थकेअर. सिस्टिम यांच्या मध्ये अधिकाधिक सुधारणा कशा होतील यासाठी सदैव प्रयत्नशील रहावे. ज्या केईएम ने आणि केईएम च्या परिचारिकांनी अरुणा शानबागची 42 वर्षे सेवा करुन संपूर्ण देशासमोर ,जगासमोर माणूसकीचा धडा घालुन दिला आहे या परिचारिका या कोरोना महामारी मध्ये ही तितक्याच निर्भयपणे ठाम उभ्या राहून प्रत्येक दिवशी कोरोनाची दोन हात करत आहेत तरी जनतेन केईएम सायन रुग्णालयात काम करत असणारे डॉक्टर, नर्सेस यांच्यावर टीका न करता, रुग्णालयांवर फक्त पुष्पवृष्टी न करता किंवा टाइम पास म्हणून टाळ्या न पिटता त्यांचे मानसीक खच्चीकरण न होऊ देता त्यांना प्रोस्ताहित करावे असे आवाहन करते. आणि परत ही मायानगरी पूर्वत होण्यासाठी मुंबईकरणानी प्रयत्नशील रहावे. तसेच देशामध्ये मंदिर,स्मारके उभी करण्यापैक्षा रुग्णालये प्रत्येक तालुक्यातील शहरात उभी करणे आणि आपली हेअल्थ केअर यत्रना भक्कम बनवणं किती आवश्यक आहे यांचा जागरूक नागरीकांनी आणि वाचकांनी विचार करावा हीच नम्र विनंती करते.
भाग्यश्री सानप,9082863640
K.E.M हॉस्पिटल परेल मुंबई