
भारताच्या तिन्ही दलाने डॉक्टर,नर्स पोलीस आणि पालिका कामगारावर आकाशातून फुलाचा वर्षाव करून आभार मानले आणि अभिनंदन केले.त्याबदल हसावे कि रडावे हेच मला समजले नाही.ज्यांचे आभार व अभिनंदन
करोडो रुपये खर्च करून करता त्या पेक्षा डॉक्टर ,नर्स,पोलीस आणि पालिका कामगार कर्मचारी यांना सुरक्षा कीट चांगल्या दर्जाच्या आणि हव्या त्या संखेने पुरविल्या तर ते व त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील यांचे भान सरकारने ठेवले पाहिजे.कोरोना १९ च्या महासंकटाला आम्ही कसे तोंड देतो हे आम्हालाच माहिती. आता आनंद व्यक्त करू शकत नाही.पण आठवण येते एप्रिल महिना म्हटल्यावर लक्षात येते ती 6 तारीख कारण ह्याच दिवशी माझा जन्म झाला. नर्सिंग हे Profession स्वीकारल्यानंतरदरवर्षी मी माझा वाढदिवस रुग्णांची सेवा करण्यातच साजरा करत आले आहे. परंतु या वर्षीचा वाढदिवस कोविड-19 साठी लक्षात राहणार आहे. जगामध्ये कोविड-19 ने थैमान घातले आणि त्यात आता आपल्या संपुर्ण देशात सुध्दा त्याचा प्रादुर्भाव जाणवू लागला. पाहता पाहता मुंबई शहरात तर कोविड-19 ने रौद्र रुप धारण केले.
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेने नागरिकांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरु केली. मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्यातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी कोविड-19 ची लागणं झालेल्या रुग्णांवर उपचार करु लागले. तसेच महापापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार सुध्दा आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावत रस्त्यावर उतरले.3 एप्रिल ला नेहमीप्रमाणे मी के.ई.एम.रुग्णालयात Evening Duty ला कामावर उपस्थित झाले. उपस्थितीची नोंद झाल्यावर मी माझ्या प्लास्टीक सर्जरी विभागात जाण्यासाठी निघत असताना, थांबायला सांगण्यात आले. नेमके काॽ. थांबविण्यात आले ते अगोदर लक्षात आले नाही परंतु कोविड-19 ची माहिती देण्यासाठी थांबविण्यात आले असेल असा अंदाज होता. मी के.ई.एम.रुग्णालयात नर्स म्हणून नियुक्त झाल्यावर वेगवेगळ्या विभागात काम करत आता प्लास्टीक सर्जरी विभागात कायम स्वरुपात नियुक्त करण्यात आले होते.
कोविड-19 मुळे पूर्ण Lock down असल्याने आमच्या ऑपरेशन थेटर ला येणा-या रुग्णाची संख्या ही कमी झाली होती. त्यामुळे आम्हाला सेव्हन हिल रुग्णालयात कोविड-19 ची Duty करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. आमच्या पुर्ण टीमला सेव्हन हिल रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला प्रथम कोविड-19 ह्या आजारावर काम करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून काढल्यावर रात्री 9 च्या दरम्यान सेव्हन हिल रुग्णालयातून मला फोन आला आणि विचारणा करण्यात आली की, माझी टीम अजून सेव्हन हिल रुग्णालयात कामावर उपस्थित का झालेली नाही. त्यावर मी स्पष्ट आदेश मिळत नाहीत तोपर्यंत मी किंवा माझे इतर सहकारी कामावर उपस्थित होणार नाहीत असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने आमच्या पुर्ण टीमची 14 दिवसांसाठी सेव्हन हिल रुग्णालयात कोविड-19 साठी नियुक्त करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. पण ह्या दोन दिवसामध्ये प्रशासनांची ताराबल आणि मॅनेजमेंट मध्ये एकमत होत नसल्याचे दिसून आले.
आता तो दिवस आला होता ज्या दिवशी माझा जन्मदिवस आणि माझ्या कोविड-19 Special duty चा प्रथम दिवस. ह्या पुढे मला पुर्ण टिम ला सोबत घेऊन आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढत माझी आणि माझ्या टिमची काळजी घेत पुढे जायचे होते. कोरोना व्हायरसची लागणं झालेल्या लोकांवर उपचार करताना मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता असल्याने त्यांना नेहमीच सकारात्मक विचार करण्याच प्रवृत्त करत पुढे जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. कोविड-19 ची लागणं झालेल्या रुग्णांवर उपचार करायला जाताना मनात दुस-या युध्दातील फ्लोरंस नाइटिंगेल यांनी जखमी सैनिकावर केलेल्या उपचारांची आठवण झाली आणि त्यच वेळी लक्षात आले की, त्यांनी त्यावेळी कमी साधने असताना देखील उत्तमरितीने काम केले तर, आम्ही आजच्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो. तसेच हे वर्ष जागतीक World Health Organization ह्या संघटनेने World Health Day ची Theame सुध्दा नर्सना डोळ्यासमोर ठेऊन होती.
Theme for world health day 2020 is to support nurses and midwives. WHO chose the year 2020 as the “Year of the Nurse and Midwife” because of the contribution which nurses and midwives are making in making the world a healthier place. “Nurses are the unsung heroes of the Covid-19 response.आम्ही ह्या परिस्थितीत कुटुंबापासून वेगळे राहत असल्याने अनेक वेळा त्यांची आठवण येत होती. ह्या परिस्थितीत त्यांना भेटने शक्य नसल्याने फोनच्या माध्यामातून त्यांच्या संपर्कात राहणे हा एकमेव पर्याय आमच्याकडे होता..
प्रत्येक दिवस खुप काही शिकवून जात होते. प्रत्येक दिवसाला नविन जबाबदा-या येत होत्या आणि तेवढेच प्रॉब्लेम समोर येत होत्या सर्वाना खंबीरपणे सामोरे जाव लागत होत. कामाचा ताणही वाढत होता. आता आराम करायला ही खुप कमी वेळ मिळत होता आणि झोप सुध्दा मिळत नव्हती. वेळेवर जेवण करणे शक्य होत नव्हते. तरीही आम्ही सर्व एक टीम म्हणून लढत होतो. कोविड-19 विरुद्ध लढत असताना प्रथम स्वत:ला सुरक्षित ठेऊन आमचा लढा सुरु झाला होता. पीपीई कीट तशी आमच्यासाठी नवीनच. पीपीई कीट मध्ये सुरुवातीला खुप अवघड व्हायचं, तासतास उभे राहून काम करत अवघटल्यासारखे होत होते परंतु या COVID-19 च्या अगोदर सुध्दा अनेक तास मी माझ्या ऑपरेशन थेटर मध्ये अनेक तास उभे राहून कर्तव्य निभावलेले असल्याने त्या पीपीई कीट मध्ये सुध्दा काम करण्याची शरीराला सवय झाली.आमच्या टीमला परिस्थिती गंभीर तेव्हा वाटू लागली जेव्हा के.ई.एम.मधून आमचेच सहकारी COVID-19 ची लागणं झाल्याने सेव्हन हिल रुग्णालयात भरती होऊ लागले. काळजी, भीती आणि ताण आमच्यावर वाढत जाऊ लागला.
कोविड-19 च्या Duty ला माझी नियुक्त झाल्याचे फक्त माझ्या कुटुंबातील माझ्या लहान भावालाच माहिती होते. आमच्या दोघांमध्ये कोविड-19 बाबतीत चर्चा होत होती आणि माझी जर त्या ठिकाणी नियुक्ती झाली तर मला त्या ठिकाणी काम करायला आवडेल असे सुध्दा सांगितले होते परंतु आई-वडीला त्या बाबतीत काही माहिती नव्हते. प्रथमच माझ्या निर्णयला लहान भावाने 100 टक्के सहमती दिली होती. नाहीतर इतर वेळी आमच्या धाडसी निर्णयावर स्वत:ला झाशीची राणी नको समजत जाऊ म्हणून टिंगल उडवणारा भाउ आज पहिल्यांदा आमच्या निर्णयाला सहमत होता यांच समाधान होते. आमचे आई-वडील बीड मध्ये राहत आहेत आणि आम्ही दोघेही वेगवेळ्या ठिकाणी त्यांच्या पासून दूर आपले कर्तव्य निभावत आहोत. आई-वडील अशिक्षित असल्याने भाऊ फोन च्या माध्यमातून त्यांना या परिस्थितीची कल्पना देत होता. पण आम्ही दोघांनी ही आई वडीलांना माझ्या कोविड-19 च्या special duty माहिती दिली नाही. उगीच त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी माझी duty के.ई.एम मध्येच चालू आहे. तुम्ही कालजी करु नये अस सतत रोज फोनवरुन सांगत आहे.
14 दिवसांच्या कर्तव्य काळावधी मध्ये आमच्या 7 जणांमध्ये एका कुटुंबा प्रमाणे वातावरण निर्माण झालं होत. एकमेकांची काळजी करणे, काळजी घेणे इथपासून काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टीची विचारपूस करत आम्ही अहोरात्र कोविड-19 लागणं झालेल्या लोकांची सेवा देत आम्ही आपली समाजसेवा आणि देशसेवा पार पाडत होतो. 18 एप्रिल ला कोविड-19 च्या कामातून कार्यमुक्त होणार म्हणून दोन दिवस अगोदर आमच्या COVIND-19 च्या चाचण्या घेण्यात आल्या आणि ग्रुप मधील तिघांना कर्तव्य निभावत असताना संसर्ग झाल्यास उघड झाल. आता मात्र पुर्ण ग्रुपच खच्चीकरण झालं होत. सर्वेजण खुप हतबल झाले. कोणाला व कसा धीर द्यायचा हे ही कळत नव्हते पण शेवटी आलेल्या परिस्थित सामोरे जाण्यासाठी एकमेकाला सावरत आमच्या टीम मधील तिघांना दवाखान्यात घेऊन जाण्याची व्यवस्था करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. कोविड-19 बरोबर आमच्या टीम ने केलेल्या ह्या 14 दिवसांच्या युध्दात 3 रुग्णालयात दाखल झाले तर 3 घरी गेले आणि मी 1 महिना अजून त्या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला. ह्या परिस्थित मुंबई महापालिका प्रशासन, केईएम रुग्णालय, सेव्हन हिल रुग्णालय यांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे ही धन्यवाद आणि भारतातील सुप्रसिध्द उद्योगपती श्री. रतन टाट यांनी ह्या कालावधीत आम्हाला त्यांच्या हॉटेमध्ये राहण्याची जी व्यवस्था केली त्यासाठी त्यांचे सुध्दा धन्यवाद व्यक्त करते.
भाग्यश्री सानप 9082863640
नर्स के ई एम हॉस्पिटल परेल मुंबई