कूकाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

आपले मत नोंदवा

do_shortcode(‘[Total_Soft_Poll id=”13″]’);?>

कूकाणा (काकासाहेब नरवणे):- येथे गणपती उत्सव तसेच मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली , यावेळी व्यासपीठावर पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे .हे अध्यक्षस्थानी होते ,
या उत्सव काळात गणेश मंडळांनी सामाजिक भान ठेवून गणेश स्थापना ते उत्सव पूर्ण होई पर्यंत काय काळजी घ्यावी याबाबत सूचना पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे यांनी केल्या.गैर प्रकार घडल्यास रीतसर गुन्हे दाखल होतील , अशाही सूचना पोलीस प्रशासनाकडून या प्रसंगी देन्यात आल्या .सोशल मीडिया वर येणाऱ्या अफवा समजाऊन न घेतल्याने समाजात तेढ निर्माण होतात , अशा अफवा आल्यास पोलिसांना अगोदर माहिती द्यावी असे आवाहन या वेळी करण्यात आले , कायदा हातात घेवू नाका , उत्सव आनंदात व शांततेत साजरे करा असेही सांगण्यात आले .
या बैठकी प्रसंगी नेवासा पोलिस निरीक्षक रंजित ढेरे , माजी सरपंच दौलतराव देशमुख , विलासराव देशमुख , मा .सरपंच एकनाथराव कावरे , कारभारी गोर्डे ,उमेश सदावर्ते , नीलेश काळे , पत्रकार अनिल गर्जे , काका नरवने , सोमनाथ कचरे , विशाल निकम , अमोल बरबडे , भारत गरड , इण्णूस नालबंद , ईसाक इनामदार, तसेच श्रीकृष्ण मंडळ , जिवा शिवा ग्रुप , शिवलीला मंडळ , साम्राज्य युवा प्रतिष्ठान , आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते .

Check Also

दोन लाख सहजयोगींची आँँनलाईन ध्यानसाधना ; जगातील ५९ देशातील साधकांची सकाळ-संध्याकाळ विश्वकल्याणाची प्रार्थना

🔊 Listen to this अहमदनगर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या दहशतीने अख्खं जग लॉकडाऊन झाले असून लोकांमध्ये •िाती, …