घोडेगाव (प्रतिनिधी) :- रविवार दि १७ रोजी सकाळी १० वाजता श्री घोडेश्वरी माध्यमिक विद्यालय घोडेगाव येथे नेवासा तालुका माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडी (टी. डी. एफ.) ची बैठक अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी निरीक्षक म्हणून संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष जनार्दन पटारे सर होते.
प्रारंभी भीमराज खोसे यांनी उपस्थितांना टी. डी. एफ. ची भूमिका समजावून सांगितली . यावेळी नेवासा तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली .
अध्यक्ष जगन्नाथ आढाव.उपाध्यक्ष अनिल भणगे,आशोक गाडे.सचिव योगेश रासने,नारायण कडु.कोषाध्यक्ष राजेंद्र पाषाण. सह अठरा कौन्सिल सदस्य निवड जाहिर करण्यात आल्या.
बैठक वनिवड प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अशोक सोनवणे, अमोल दहातोंडे,सोनवणे डि आर, ऊध्दवराव सोनवणे यांनी परिश्रम घेतले.नुतन पदाधिकारी यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले.