सोनई ( विजय खंडागळे ) :- राज्यातील ओ. बी.सी.समाजाचे आरक्षण रद्द करू पाहणाऱ्या विरुद्ध दिनांक 1 जुलै 2021 रोजी सकाळी दहा वाजता त्रिमूर्ती प्लास्टिक इंडस्ट्रीज रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी अहमदनगर रोड नेवासा फाटा या ठिकाणी तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त करून भविष्यात वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ओ. बी.सी.आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे त्यावर विचार विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस नेवासा तालुक्याचे माजी आमदार श्री पांडुरंगाचे अभंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी श्रीभिवाजी आघाव यांनी प्रास्ताविक केले. तर माजी सभापती श्री कारभारी जावळे, भानस हिवरे चे या सरपंच श्री देविदास साळुंके, जिल्हा परिषद माजी सदस्य श्री पुरुषोत्तम सर्जे, माजी उपसभापती श्री तुकारामजी मिसाळ, सभापती श्री काशिनाथ अण्णा नवले, माजी सरपंच श्री एकनाथ धानापुणे,. कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री अशोकराव कोळेकर, श्री नामदेव खंडागळे गुरुजी, ज्ञानेश्वर चे संचालक श्री अशोकराव मिसाळ ,श्रीकचरू दादा भागवत, डॉक्टर श्री रावसाहेब फुलारी ,कुंभार समाजाचे श्री राजेंद्र बोरुडे, सरपंच श्री संभाजी गवळी, बारा बलुतेदार संघाची श्री सागर आगळे, नाभिक संघटनेची श्री संभाजी गवळी ,संजय वखरे, वडार समाजाचे नेते श्री संदीप कुसळकर, जोशी समाजाचे नेते श्री अंबादास गोंडे, सुतार समाजाची श्री विवेक ननवरे ,कैकाडी समाजाचे श्री गायकवाड ,कहार समाजाचे नेते श्री पोपटराव जिरे ,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री शशिकांत मतकर यांनी सूत्रसंचालन केले तर श्री शिवाजी शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी माजी आमदार श्री पांडुरंग अभंग साहेब यांनी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने संघटनेने कशा प्रकारची भूमिका पार पाडली पाहिजे पुढील कशा पद्धतीने काम केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.माजी सरपंच देविदास साळुंके,व माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषउत्तम सर्जे यांनी मनोगत व्यक्त केले.
Check Also
पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करा
🔊 Listen to this प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन …