सोनई- – स्व. रामचंद्र दगडु वाघ उर्फ दादा वाघ (ड्राईव्हर) यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने सोनई येथील गावात,परिसरात एक सामाजिक कार्य म्हणून यशवंत सामाजीक प्रतिष्ठान व शारदा ताई फाउंडेशन यांच्या प्रेरणेने वृक्षारोपण करून स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी तंटामुक्ती चे अध्यक्ष विश्वासराव गडाख यांच्या हस्ते नुकतेच वृक्ष रोपण करून समाजाला पर्यावरणाचा संदेश दिला. श्री.गडाख म्हणाले,स्व.दादा आज आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले असून स्व. दादांनी अतिशय गरीब परिस्थिती तून आपला संसार उभा केला. दादांनी सोनई गावासह बरेच ठिकाणी वृक्ष रोपण केले आहे. मुक्ती धाम ओटा, नदीपात्र, कुंभार गल्ली, गडाख गल्ली, महादेव मंदिर, सार्वजनिक अमरधाम, सिनेमा थिएटर, येथे वृक्षा रोपण करून त्याचे संगोपन केले आहे. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त त्यांची मुले रमाकांत वाघ, मल्हारी वाघ, तानाजी वाघ, भाऊराव वाघ, व त्यांचे पुतणे सोनईचे सरपंच धनंजय वाघ यांनी देखील सोनई येथील गडाख स्मशान भूमीत वृक्षारोपण करून स्व.दादांना श्रद्धांजली अर्पण केली. माघील कित्येक वर्षांपासून वृक्षारोपण केलेले झाडी दिमाखदार पणे डोलत आहे.यात स्व.दादा वाघ यांचे मोठे योगदान आहे.ज्येष्ठ नेते मा. श्री. विश्वास मामा गडाख पाटील यांच्या सह अनेकांनी वृक्षा रोपण करून स्व. दादांना आदरांजली अर्पण केली. वृक्षारोपणचा उपक्रम स्व. दादां यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी वृक्ष लागवड उपक्रम राबवत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Check Also
पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करा
🔊 Listen to this प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन …