पालकांचे सम्मतीने विद्यार्थी शाळेत येणार — प्राचार्य विजय पोकळे
घोडेगाव ( प्रतिनिधी ) :- कोविड २९या महामारीने गेल्या दोन वर्षापासुन शाळा महाविद्यालय बंद होती. आँनलाईन शिक्षण चालु होते. आता सोमवार दि ४आक्टोबर पासुन शाळा सुरु होत आहे. विद्यार्थी व पालकांना शाळा सुरु व्हावी असे वाटत असतानाच शासनाने शाळा सुरु करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांना पालकांचे सम्मती पत्र शाळा प्रवेशासाठी अत्यावश्यक आहे. त्याशिवाय त्यांना प्रवेश मिळणार नसल्याचे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय पोकळे यांनी माहिती देताना सांगितले.
विद्यालयाच्या सर्व वर्गा मधे सँनिटायझर फवारणी करण्यात आली.खोल्यांची स्वच्छता केली.क्रीडांगण ही स्वच्छ केले. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी बेसीन बसवले, आर ओ चे शुध्द पिण्याचे पाणी साठी विद्यार्थी पालक संघ निधीतून आर ओ प्लांट हजाल लिटर टाकी सह ऊभारला. टाँयलेट बाथरुम स्वच्छता झाली आहे. विद्यार्थी ,शिक्षक, पालक यांचेसाठी मार्गदर्शक सुचना फलक लावले आहेत.
विद्यार्थ्यांना उपस्थिती सक्तीची नाही. प्रवेशावेळी पालकांचे सम्मतीपत्र आवश्यक.प्रत्येक विद्यार्थी टेम्परेचर नोंद घेणार.आजारींंना प्रवेश नाही. सँनिटायझर नेहात स्वच्छ केल्यवरच वर्गात प्रवेश. सर्वांना मास्क आवश्यक,नसेल त्यास मास्क देणार.
नववी ते बारावी शाळा सकाळी आठ ते साडेदहा पर्यंत विद्यार्थी संख्या सातशे नउ.तर पाचवी ते आठवी अकरा ते अडिच वाजे पर्यंत असा वेळ असेल. जेवणाची सुटी नसल्याने विद्यार्थ्यांनी घरुनच जेवण करुन यायचे आहे.
येथील शिक्षक संख्या सदोतीस तर शिक्षकेतर आठ कर्मचारी आहेत .सर्वांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असुन त्याचे प्रमाणपत्र शाळेस सादर केले आहेत.
सुरुवातीला विद्यार्थ्यांना अभ्यास व शाळा जड जाऊ नये म्हणुन मागील अभ्यास व हसत खेळत शिक्षण यावर भर देऊन विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करुनच हळुहळु अभ्यासक्रम चालु होईल .विद्यार्थी क्रिडांगणावर खेळायला नेता येणार नाहीत. अन् सगळ्यात महत्वाचे म्हणजे गर्दी टाळण्यासाठी शाळा संपल्यानंतर एक एक वर्ग सोडला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कोविड१९चे व शासनाने आणी शाळेने घालून दिलेले सर्व नियम पाळावेत असे आवाहन उप प्राचार्य बी जी चव्हाण सुपरवायझर संगिता शिंदे यांनी केले आहे. तर प्रा शरद दारकुंडे,महेंद्र झाडे,दादासाहेब कदम, लेखणीक सुनील थोरात यांनी परिश्रम घेतले.