नेवासा ( प्रतिनिधी):- सोनई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस सहाय्यक निरीक्षक संगीता तीर्थराज गोसावी(गिरी) यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत त्यांच्या चिमुकल्या मुलाचा पहिला वाढदिवस नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्ध आश्रमात साजरा करून समाजात एक आदर्शवत उपक्रम केला आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चि.संगराज तीर्थराज गोसावी असे या मुलाचे नाव आहे यांचा पहिला वाढदिवस आई वडील च्या इच्छा नुसार अनाथ आश्रमात किंवा वृध्दाश्रमात साजरा करण्यात यावा अशी त्यांची इच्छा होती त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी आज आपल्या मुलाचा वाढदिवस नेवासाफाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमात साजरा केला.
यावेळेस मा.संगीता मॅडम यांनी वृध्दाश्रमातील वृध्दमात्यापिसाठी उबदार बॅकेट देवून सर्वाना मिष्टान्न भोजन दिले यावेळी छोटेखानी कार्यक्रमात संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी दोन्ही दापत्याचा सत्कार केला. तर वृध्दाश्रमातील सध परिस्थितीतची माहिती पोलीस हवालदार संजु बाबा गायकवाड यांनी दिली.
यावेळी मॅडम बोलताना म्हटल्या की आम्हास साईबाबांच्या आशीर्वादाने मिळालेले फुल आहे कामाच्या व्यापात व कायदा सुव्यवस्था संभाळत असताना आपल्या कुटूंबाला वेळ देणे देखील तितकेच महत्त्वाचे असते एक महिला आधिकारी असले तरी एक आई देखील आहे आणि तिचे सर्व कर्तव्य मी पार पाडत आहे म्हणून आम्ही त्याचा वाढदिवस अनाथलय,वृध्दाश्रमात इत्यादीं ठिकाणीच करून आमच्या मुलाला समाजसेवेचे बाळकडू पाजणार आहोत असे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता तीर्थराज गोसावी(गिरी) म्हणाल्या
यावेळी बापूसाहेब काशीनाथ गोसावी,कविता बापूसाहेब गोसावी, पद्मिनी विलास गिरी,मनोज जालिंदर गोसावी,पुजा मनोज गोसावी ,संजुबाबा गायकवाड, रावसाहेब मगर,सचिव सुरेखाताई मगर मार्गदर्शक बाळासाहेब देवखिळे शरणपूर वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुधीर भाऊ चव्हाण व्यवस्थापक संतोष मगर इत्यादी उपस्थित होते.
माणुसकीच्या नात्याने आपण देखील कुठंतरी समाजाचं देणं लागतो मी देखील सामान्य कुटूंबातील आहे कोरोना सारख्या महामारीत एकमेकांना मदत करणे खूप गरजेचे आहे शरणपूर वृद्ध आश्रम येथे गोरगरिब गरजू वतांना परिवारा सह भोजन देऊन आज वाढदिवस साजरा केला यांचेच समाधान वाटत आहे.
संगीता तीर्थराज गोसावी(गिरी)
सहाय्यक पोलीस निरीक्षक