संत सेना महाराजांचे वाड़् मय हे उदबोधक- महंत सुनिलगिरी महाराज

 

कुकाणा ( सुनिल पंडित ):- मानवाचे कल्याण व्हावे या दृष्टीने संत सेना महाराज यांनी सातत्याने प्रयत्न केले. संत सेना महाराज यांचे वाड़् मय हे उदबोधक असून समकालीन परिस्थितीत आवश्यक आहे. असे प्रतिपादन श्रीराम साधना आश्रमचे महंत सुनिलगिरी महाराज यांनी केले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित संत सेना महाराज ग्रुप कुकाणा व परिसरातील नाभिक बांधवाच्या वतीने येथील विठ्ठल मंदिर सभागृहात अयोजित करण्यात आलेल्या संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळया प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी महंत सुनिलगिरी महाराज यांच्या हस्ते विधीवत पुजा करून माजी आमदार पांडुरग अभंग, ज्ञानेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, क्रांतीकारीचे ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, माजी सरपंच एकनाथ कावरे, दौलतराव देशमुख, समता पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग,
नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ पंडित, एकनाथ कचरे, प्रा. संतोष तागड, बाळासाहेब पाटील, युवा नेते प्रविण गडाख, अजित मंडलिक, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर खंडागळे यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रस्ताविक ग्रुपचे संस्थापक पत्रकार सुनिल पंडित यांनी केले
आपल्या कर्मावर आपल्याला गती प्राप्त होत असते. असा विचार संत सेना महाराज यांच्या अदभुत चमत्कारातुन सिध्द होतो . असेही महंत सुनिलगिरी महाराज यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार पांडुरग अभंग, क्रांतीकारीचे ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, प्रा. संतोष तागड यांनी संताचे विचार विशद केले. यावेळी डॉ. सुभाष भागवत, माजी उपसरपंच बाळासाहेब कचरे, आत्माराम लोंढे, भाऊसाहेब फोलाणे, उमेश सदावर्ते, भारत गरड राजेंद्र म्हस्के हे हजर होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष सचिन पंडित , उपाध्यक्ष सचिन पवार , मार्गदर्शक अनिल पंडित, अशोक पंडित, अर्जुन पंडित, तुकाराम पवार, समाजसेवक संजय वाघ, रविंद्र निकम, ज्ञानेश्वर लिंगायत, शरद कदम, कारभारी वखरे, लक्ष्मण कदम, सुभाष पंडित,संदिप वाघ,गणेश कदम, दिपक पंडित, अमोल पवार, रविंद्र कदम, ज्ञानेश्वर पंडित, दत्तात्रय पवार, एकनाथ पंडित,राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब पंडित, छत्रपती वाघ, अमोल पंडित, किशोर पंडित, शाम पंडित आदिंनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते तर महिलांची संख्या लक्षणीय होती. गोकुळ वाघमारे यांनी आभार मानले.