जालना ( प्रतिनिधी ):- पुण्यात सुप्रसिद्ध असलेल्या चायवालेची शाखा आता जालन्यात सुरु झाली आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर यांच्या हस्ते या चायवाले शॉपचं उद्घाटन करण्यात आलं. जालन्यातल्या मंठा चौफुलीवर हे नवीन शॉप सुरु करण्यात आलं.
श्रीपाद देशपांडे आणि उपेंद्र जपे यांनी 19 फेब्रुवारी 2019 ला चायवाले हा ब्रँड सुरु केला. या ब्रँडच्या सहा महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकात तब्बल 15 शाखा यशस्वीपणे सुरु आहेत.
नुसता चहाविक्रीच नाही तर जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार देता येईल, भारतीय पेय कसे जगभरात लोकप्रिय करता येईल, स्वच्छ भारत अभियान हे डोळ्यासमोर ठेवून चायवालेचा प्रवास सुरु आहे.
जालन्यातील या शॉपच्या उद्घाटनाला शिवसेनेचे लोकप्रिय आमदार, व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री अर्जुनरावजी खोतकर, जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजेशजी राऊत, परशुराम सेवा संघाचे अनिलजी मुळे, उल्हासजी अकोलकर, सौ उत्तराताई अकोलकर, चंपालालजी भगत, संतोष बेनिवाल, मयूर लोखंडे, सुदर्शनजी वैद्य इ. उद्योगपती आणि शहरातील मान्यवर
उपस्थित होते.
दरम्यान अर्जुन खोतकर यांनी चहा पिल्यानंतर या चायवालेचं भरभरून कौतुक केले.