
नेवासा(प्रतिनिधी):- महावितरण मुख्य कार्यालय यांचे निर्देशानुसार व मा.कार्यकारी अभियंता श्री.मनीषकुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली महावितरण कार्यालय नेवासा उपविभाग येथे महावितरण ने ‘जनकल्याण रक्तपेढी-अहमदनगर’ यांचे सहाय्याने दि.११.१०.२०१९ रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये २४ महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सदर रक्तदान शिबिरासाठी महावितरण तर्फे श्री.शरद चेचर (उप कार्यकारी अभियंता), सहाय्यक अभियंता श्री.मनोहर पाटील, श्री.दुधे, श्री.काळे, श्री.वाघ, श्री.आकाश शेजुळे, श्री.कायास्थे, श्री.राकेश भंगाळे, श्री.विजय पाटील, कनिष्ठ लिपिक श्री.शरद अरगडे, बिलिंग विभागाचे श्री.भूषण पवार, श्री.नितीन जोशी यांचे आणि जनकल्याण रक्तपेढी तर्फे जनसंपर्क अधिकारी डॉ.श्री.विलास मढीकर, डॉ.श्री.वसंत झेंडे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
सदर रक्तदान शिबीर राबवून महावितरण कंपनीने सामाजिक बांधिलकी जपून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.