२३ऑक्टोबर रोजी रंगणार ८ वी श्रीरामपूर व्हॉलिबॉल प्रीमियर लीग


श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आठवी श्रीरामपूर व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ची निवड चाचणी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी या ठिकाणी घेण्यात आली. या निवड चाचणीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक इंग्लिश स्कूल,अशोक आयडियल स्कूल,सेंट झेवियर्स,श्रीराम ॲकॅडमी डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल,विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल,विद्यानिकेतन अकॅडमी,प्रवरा फत्याबाद व न्यू इंग्लिश स्कूल या सर्व शाळेतील १२५ मुला-मुलींनी या चाचणीत सहभाग नोंदवला. निवड चाचणीतून १०८ मुला-मुलींची निवड करून त्यांची ११ संघांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुलांच्या मोठ्या गटात ४ संघ,मुलांच्या छोट्या गटात ४ संघ तर मुलींचे ३ संघ विजेतेपदासाठी लागणार आहेत. श्रीरामपूर अटॅकर्सचा कर्णधार श्रीराम डावखर,श्रीरामपूर सेटर्स कर्णधार यशराज पटारे,श्रीरामपूर ब्लॉकर्स ओम पापडीवाल,श्रीरामपूर डिफेंडर शिवराज सलालकर,श्रीरामपूर वारियर्स शंतनु शेरकर,श्रीरामपूर रायडर्स शुभम खाडे,श्रीरामपूर किंग्स पियुष चूग,श्रीरामपुर चॅम्पियन,सिद्धार्थ लोखंडे श्रीरामपूर चॅलेंजर्स तन्वी कापसे, श्रीरामपूर स्टार्स भूमिका त्रिभुवन,श्रीरामपूर रॉयल्स अनुराधा भडके यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती आयोजक श्री नितीन गायधने यांनी दिली. या स्पर्धेत एकूण 18 सामने रंगणार आहेत प्रत्येक सामनावीर साठी श्री एस जी पटेल यांच्याकडून खेळाडूंना मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अर्चीता मोबाईल शॉपी श्री राजेश बालाणी यांच्याकडून मोबाईल पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री नितीन बलराज,श्री अमोल गिरमे,श्री अतुल जाधव,श्री असिफ पठाण,श्री अनिल तेलगट श्री राजु आढाव,श्री गौरव डेंगळे तसेच सर्व शिक्षक वृंद प्रयत्नशील आहे.
निवड झालेले संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे
*श्रीरामपूर अटॅकर्स*
श्रीराम डावखर(कर्णधार),अथर्व नाईक,ऋत्विक कलापुरे,कृष्णा भोसले,अथर्व लोटके,निखिल निकम,कार्तिक किल,आदेश थोरात,गौरव थोरात, प्रशिक्षक धनंजय माळी.
*श्रीरामपूर सेटर्स*
यशराज पटारे(कर्णधार),ओम लोटके,उत्कर्ष यादव,धीरज यादव,आशिष यादव,नंदकुमार चाबुकस्वार,आशुतोष तांबे,अभिराम ढोले,अमरजीत यादव,प्रशिक्षक शशांक चौधरी.
*श्रीरामपूर ब्लॉकर्स*
ओम पापडीवाल(कर्णधार),आर्यन धुमाळ वायुज पोखरकर,आदित्य यादव,कुणाल शेजुळ,अनिकेत गायधने,श्री विखंकर,ओम पाटील ऋषिकेश ऊडे,प्रशिक्षक प्रसाद काकडे.
*श्रीरामपूर डिफेंडर*
शिवराज सलालकर(कर्णधार) समृद्ध पाटील,चींमय जोशी,कार्तिक उंडे,प्रज्वल गायकवाड,युवराज सिंग,कार्तिक गोंधळ,सार्थक देवकर,प्रशिक्षक तमन भाटिया.
*श्रीरामपूर वॉरियर्स*
शंतनु शेरकर(कर्णधार),ओम सुपारे,ओम चौधरी, यश भिटे,अथर्व पुंड,प्रसाद देवकर,निकुंज पटेल,सिद्धांत पवार,अभिषेक पटारे,संयम अाेहोळ प्रशिक्षक भुषण माळी.
*श्रीरामपूर रायडर्स*
शुभम खाडे(कर्णधार),विक्रम शेळके,सोहम दौंड,सार्थक चौधरी,प्रथमेश खाडे,ओमकार सातपुते,फरान मसूरी,अक्षय थोरात,विवेक उंडे,रुद्राक्ष गायकवाड,प्रशिक्षक दानिश खान.
*श्रीरामपूर किंग्स*
पियुष चूग(कर्णधार),चैतन्य साबदे,कृष्णा साबदे,युवराज शिंदे,तेजस फडके,सुमित अनारसे,प्रसाद पारखे,संकेत ओमने,सतीश पवार,आसिफा शेख,प्रशिक्षक वेदांत साबदे.
*श्रीरामपूर चॅम्पियन्स*
सिद्धार्थ लोखंडे(कर्णधार),शुभ पवार,सुरेश नाईक,तेजस ताकी,रेहान इनामदार,प्रशांत भडके,चैतन्य नांदे,स्वप्नील सुपेकर,शुभम राऊत,प्रणव पवार प्रशिक्षक प्रणव अवताडे.
*श्रीरामपूर चॅलेंजर्स*
तन्वी कापसे(कर्णधार),त्रिशा परदेशी,अनुजा देशमुख,इलक्षी भोसले,त्रिषा वाघ,अनुष्का मगर,श्रावणी उंडे,तुषा शेख.
*श्रीरामपूर स्टार्स*
भूमिका त्रिभुवन(कर्णधार),खुशी यादव,समृद्धी अभंग,स्नेहा गिरमे,वैष्णवी साबळे,सुहानी यादव,देवयानी पटारे,मनाली फंड.
*श्रीरामपूर रॉयल्स*
अनुराधा भडके(कर्णधार),श्रुतिका चौधरी,दर्शनी पाटील,खुशी यादव सोम्या झिरमिते,मैथिली धुमाळ वेदिका वैद्य,सुप्रिया उंडे,ईश्वरी गवारे.