आदित्य ठाकरे भावी ‘मुख्यमंत्री’ ! वरळीत लागले ‘पोस्टर’

मुंबई ( प्रतिनिधी ):– महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला या निवडणुकीत विजय मिळाला. असे असताना नुकतेच असे काही पोस्टर पाहायला मिळत आहेत ज्यात आदित्य ठाकरेंना भावी मुख्यमंत्री म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात होते. तेथून त्यांना विजय मिळाला आहे. यानंतर मात्र आता आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे समर्थन करणारे पोस्टर लावल्याचे दिसत आहेत. वरळीत हे पोस्टर लावल्याचे समजत आहे.
आदित्य ठाकरे हे वरळीमधून 67672 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या सुरवातीपासूनच आदित्य ठाकरे आघाडीवर होते.
वरळी मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होती. या मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही निवडणूक लढवत होते. मनसेने मात्र या मतदार संघातून उमेदवार दिला नव्हता. आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्याऐवजी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी दिली होती .

Check Also

अन्नधान्य पिकविण्यात शेतकरी अग्रेसर असल्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात देश तरला – हभप उद्धव महाराज

🔊 Listen to this अन्नधान्य पिकविण्यात शेतकरी अग्रेसर असल्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात देश तरला – हभप …