कर्जत (आशिष बोरा यांजकडून):- कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला, यावेळी सर्व नर्सेस यानी प्रतिज्ञा म्हटली.
कर्जत येथे परिचारिका दिनानिमित्त फॉरेन नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतीक परिचारिका दिन साजरा करण्यात आला फ्लोरेन्स नाईटिंगेल याचा जन्म
१२ मे १८२० रोजी इटली मध्ये झाला, त्यांनी १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलम पट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका म्हणून सेवा दिली, आधुनिक सुश्रुशा शास्त्राच्या संस्थापिका म्हणून त्यांना ओळखले जाते,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिचरिकाचे महत्व समाजाला पटले असून या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ मधुकर काळदाते, डॉ सुचेता यादव, डॉ शबिना शेख, डॉ शरदकुमार पवार, अधीसेविका आशा गायकवाड, परिसेविका विद्या कैतके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यानिमित्त परिचारिका सविता शिंदे, जयश्री शिंदे, शीतल सरडे, दर्शना गोरे यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नर्सिंगच्या कामाला पाठबळाची गरज आहे समाजाने नर्सेस कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या तर डॉ सुचेता यादव यांनी नर्सेस शिवाय डॉकटर कामच करू शकत नाहीत असे गौरवोद्गार काढून सर्वाना शुभेच्छा दिल्या डॉक्टर मधुकर काळदाते यांनी नर्सेस यांचे काम डॉक्टरांच्या उपचारा अगोदर व उपचारानंतरही सुरू असते त्यामुळे डॉक्टरांनी इतकेच नर्सेस यांना ही आरोग्य क्षेत्रात महत्त्व असल्याचे म्हटले व अहमदनगर जिल्ह्यातील बूथ हॉस्पिटल हे सर्वात जुने आरोग्य क्षेत्रातील स्थान असून त्याबाबतच्या आठवणी व माहिती विषद केली, स्वतःचे दुःख विसरून रुग्णाच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणाऱ्या या परिचारिकांना कर्जत तालुका पत्रकार संघ व भारतीय जैन संघटनेच्या वतीने आशिष बोरा यांनी शुभेच्छा दिल्या. या छोट्याशा कार्यक्रमात सोशल डिस्टन्स ठेवत सॅनीटायझरचा वापर करण्यात आला यावेळी सूत्रसंचलन दर्शना गोरे यांनी केले, शेवटी माधुरी हजारे यांनी आभार मानले या प्रसंगी परिचारिका अर्चना जाधव, मनीषा पिसाळ, ज्योती डगले, मोहिनी नागरगोजे, विमल हिंगे, सविता शीदोरे, ज्योती चित्ते, सुषमा निंबाळकर या परिचारिका सह उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी व स्टाफ उपस्थित होता.
Check Also
२७ मे रोजी शारीरिक अंतर पाळून सर्वत्र निषेध व प्रतिकार दिन पाळणार – किसान सभा
🔊 Listen to this मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ):– मोदी सरकारच्या सातत्याच्या दुर्लक्षाविरुद्ध शेतकऱ्यांची …