
करजगांव ( प्रतिनिधी ) :- नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथिल मुळा नदी पात्रातुन विनापरवाना चोरटी वाहतूक करणारा टेम्पो गावातील तरूणांनी पकडुन दिल्याच्या रागातुन लखन सुरेश घावटे रा.अंमळनेर या तरूणास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
लखन घावटे यांनी दिलेल्या फिर्यादेवरून अनिकेत नानासाहेब पवार रा.अंमळनेर (ता.नेवासा) याच्या विरोधात भादवि कलम 504,506 प्रमाणे सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तु माझी वाळुची गाडी का पकडुन दिली ,तुला ढंपरखाली चिरडुन टाकीन असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
दि.22 एप्रिल रोजी रात्री सुमारे 12:30च्या दरम्यान अंमळनेर ग्रामस्थांनी मुळा नदी पात्रातुन वाळु घेऊन जाणारा अशोक लेलँड टेम्पो पकडुन पोलिसांच्या हवाली केला होता.
सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल थोरात पुढील तपास करीत आहेत.
तहसीलदार यांनी केले तरुणांचे कौतुक
अंमळनेर येथे रात्री चोरटी वाळु वाहतूक करणाऱ्या टेम्पोला पकडुन दिल्याबद्दल नेवासाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तरुणांचे कौतुक केले. कोरोणाच्या पाश्वभुमीवर पर्यावरणाचेही रक्षण करण्यास ग्रामस्थांनी पुढे येण्याचे आव्हाहन केले होते.
एकीकडे तहसिलदार वाळुचोरी पकडुन दिल्याबद्दल कौतुक करतात दुसरीकडे वाळुचोरी करणारे दिवसा ढवळ्या वाळु पकडुन दिल्याबद्दल ठार मारण्याची धमकी देत आहे.