व्यापारी व गिऱ्हाईकांनी सोशल डिस्टंस चे पालन न केल्याने श्रीगोंद्यात १५ दुकाने सिल ; पुन्हा बंद चे आदेश

श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) :- सर्वत्र लॉक डाऊन चालू असल्याने नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवा ची दुकाने चालू ठेवली आहेत .तालुक्यात कोरोना बाधित वा संशयित रुग्ण नसल्याने येथील स्थानिक प्रशासनाने थोडी रिस्क घेत व्यापारी व नागरिकांना सोशल डिस्टंस चे पालन करा,स्यानिताईज ,मास्क चा वापर करा,गर्दी करू नका या अटींवर वाईन्स व कपड्याचे दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती व त्यानंतर मोबाईल,हार्ड वे अर,स्टेशनरी,स्वीट होम,ज्वेलरी आदी व्यवसाइकांना नियमांचे पालन करून ठराविक वेळ देवून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र कापड बाजार सुरू होताच पहिल्याच दिवशी गिऱ्हाईकांनी गर्दीचा उच्चांक करत नियमांची पायमल्ली केली. तर व्यापाऱ्यांनी ही केवळ धंदा करण्याच्या नादात सामाजिक अंतर,स्यानेताईज ,मास्क चा वापर या सर्वांना तिलांजली दिल्याने कापड बाजार बंद करण्यात आला तर काल इतर व्यापाऱ्यांना ही ठरवून दिलेले नियमांचे पालन करण्याच्या अटींवर दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने जवळपास सर्वत्रच उघडीप दिसत होती जवाबदारी म्हणून परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी तहसीलदार,नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक व आरोग्य अधिकारी यांनी शहरात राऊंड घेतला असता त्यांना बऱ्याच ठिकाणी गिऱ्हाई कांनी गर्दी केलेली दिसून आली. तसेच व्यापारीही त्यांना सामाजिक आंतर न पाळता ,स्यानेताई ज न करता,मास्क न वापरता देव घेव करत असल्याचे दिसल्याने त्यांनी शहरातील वाईन शॉप,मोबाईल शॉपी,सोने चांदी विक्रीचे दुकान ,स्वीट होम,किराणा आदी प्रकारच्या १५ दुकानांवर सील ची कारवाई केली दरम्यान कारवाई करण्यात आलेल्या दुकानांवर नगर परिषद देखील नोटीस बजावून कारवाई करणार असल्याचे समजते .गिऱ्हाईक व दुकानदार या दोहोनिही सोशल डिस्टंस सह इतर नियमांचे पालन न केल्याने इतर दुकाने पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Check Also

मृत्युनंतर व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित ; संगमनेर तालुक्यात खळबळ

🔊 Listen to this   संगमनेर ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील …