
लोणी (प्रतिनिधी):- विज्ञान जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता यावर आधारित घेतलेल्या डॉक्टर सी व्ही रामन बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत कोल्हार न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी कुमारी चैताली पंढरीनाथ शिरसाठ (इयत्ता सातवी) हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला तर इयत्ता नववीतील चिरंजीव विकास पंढरीनाथ शिरसाठ यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकविला. विशेष म्हणजे हे दोन्ही विद्यार्थी एकाच घरातील असून सखे भाऊबहीण आहेत व कोल्हार खु (कोंबदवाडी)येथील रहवासी आहे.त्यांना विभाग प्रमुख सौ फुलारी ,श्रीमती शिंदे,सौ काळे,सौ कडू ,श्री धनवडे,श्री बनकर सर तसेच मुख्यध्यपक सोनवणे सर तसेच वडील पंढरीनाथ व आई वंदना यांचे मार्गदर्शन लाभले.
दोघा भाऊहिणीच्या यशा बद्दल कोल्हार खु चे उपसरपंच किशोर घोगरे त्यांनी अभिनंदन केले असून परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.