सोनई ( प्रतिनिधी ):- भुजल विभाग अहमदनगर व नेवासा तालुका पत्रकार एकता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी बचत काळाची गरज ‘ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.यामध्ये
पत्रकारांबरोबरच अनेक सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ऑनलाईन कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी केंद्रीय भुजल मंडलाचे वरीष्ठ भुजलवैज्ञानिक उपेंद्र धोंडे होते.
उपस्थितांचे स्वागत पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष सुनिल गर्जे यांनी केले.पत्रकार सुखदेव फुलारी यांनी
ऑनलाईन कार्यशाळा बाबत माहिती दिली.
नगरच्या भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्र.वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यात भुजलचे सुरु असलेले काम व भविष्यातील आवश्यक बाबी विषद केल्या. भुजल विकास यंत्रणाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी सर्व सहभागी पत्रकार व इतरांना माहीतीपट दाखवून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
ऑनलाईन कार्यशाळेच्या चर्चेत एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल गर्जे,माजी अध्यक्ष विनायक दरंदले,जेष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी,कारभारी गरड,सोमनाथ कचरे,दादासाहेब निकम,सीना भुजल व्यवस्थापन(डोंगरगण)चे अध्यक्ष कैलास पठारे यांनी भाग घेतला.बाळकृष्ण पुरोहित,शंकर नाबदे,सुहास पठाडे,अशोक पेहरकर,ग्रामीण संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे,राजेंद्र वाघमारे,अदिनाथ म्हस्के,
संतोष सोनवणे,सुधाकर होंडे,विकास बर्डे, राहुल कोळसे,गणेश दारकुंडे,दिनेश दिक्षीत,गोरक्षनाथ सावंत,अनिल रोडे,दिलीप तावरे ज्ञानदेव बाबर,शशी पवार,प्रकाश आघाव सहभागी झाले होते.
उपस्थित पत्रकारांनी अनेक गावातील पुरातन बारव व वहिरी गायब करुन अतिक्रमण होत आहे.,गावात कुपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीजवळ खाजगी कुपनलिका घेता येते का.नेवासा तालुक्यातून मुळा, प्रवरा व गोदावरी नदी वाहते तालुक्यात आवश्यक पाऊस पडत असतानाही पावसाळ्यापुर्वी पाण्याची अडचण येते.यासह भुजल कायदा व आवश्यक उपाययोजना बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
फक्त दोनशे फुट खोल कुपनलिका घेतली तर त्याचा रिचार्ज अधिक चांगला होतो.अज्ञानपणा असल्याने अधिक खोल घेण्याची चाललेली स्पर्धा भविष्यात अडचणीची ठरेल असे सांगून जलबोध अभियानचे प्रमुख उपेंद्र धोंडे यांनी सन २०१८ मध्ये आंबेगाव,जुन्नर, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील काही गावात राबवलेल्या अभियानचा मोठा फायदा होत असल्याचे सांगितले. भुगर्भ कोरडा होवू नये याकरीता यापुढे सतत समग्र कार्य करणे आवश्यक आहे. असे सांगितले.भुजलचे रश्मी कदम व अजिंक्य काटकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. बाळकृष्ण पुरोहित यांनी आभार मानले