नेवासा (काकासाहेब नरवणे ): – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुपेवस्ती (तरवडी) शाळेत ऑनलाईन पालक मेळावा घेण्यात आला सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी व कार्यवाही याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष 2021-23 या वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आली आणि सर्वांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीने करण्यात आली. या ऑनलाइन पालक मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समिती मसुदा 17 जून 2010 नुसार रचना आणि शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य याविषयी शाळेचे मुख्याध्यापक श्री.रामभाऊ गवळी यांनी उपस्थित पालक मेळाव्यात मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समितीत सर्व घटकांना आणि 50 टक्के महिलांना तसेच दिव्यांग पालकांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले. विद्यमान अध्यक्ष श्री.महादेव तुपे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली तर श्री रामदास घुले यांनी अनुमोदन दिले.सरपंच श्री.जालिंदर तुपे,श्री.कौशीराम नाईक सर, श्री रावसाहेब बोराटे, महेंद्र नाईक आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यमान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कामकाजावर सर्वांनी विश्वास दाखवून शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यपद्धतीचे अभिनंदन केले. आजच्या ऑनलाईन पालक मेळाव्यात श्री किशोर बहिरनाथ कन्हेरकर यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी महादेव सोपान तुपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आजच्याऑनलाइन पालक मेळाव्या साठी गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री.जालिंदर तुपे उपसरपंच श्री दत्तात्रय भारस्कर, माजी सरपंच बाबासाहेब घुले शाळेतील सर्व शिक्षक वृंद, पालक महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑनलाईन पालक मेळावा घेण्यापूर्वी दिनांक 8/07/ 2021रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली होती; तसेच एक दिवस अगोदर सर्व पालकांना व्हाट्सअँप आणि फोनद्वारे पालक मेळावा आणि पालक मेळाव्यातील विषयाबाबत अवगत करण्यात आले होते. पालक मेळाव्याचे प्रास्ताविक श्री वसंत तांबे सर, पालक मेळाव्यातील विषय सादरीकरण भारत कोठुळे सर यांनी केले, तर आभार दळे मॅडम यांनी मानले.