नेवासा ( प्रतिनिधी ):- कोरेाना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पाश्चभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते महेश मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त दै.लोकमत, गोल्डन ग्रुप, ना.शंकरराव गडाख मित्रमंडळ व रघुजन गॅस सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यामानाने शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले आहे.
या रक्तदान शिबिराचा शुभारंभ तालुक्याचे युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते करण्यात आला तर श्रीमती नूतन भाभी जेधे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले हस्ते करण्यात आले. यावेळी गडाख बोलताना म्हणाले की,कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राबवित असलेला रक्तदानाचा उपक्रम स्वागतार्ह आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवणार असल्याची ग्वाही त्यांनी बोलताना दिली यावेळी गोल्डन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धायजे,अध्यक्ष सुधीर बोरकर,अभय गुगळे,विनायक नळकांडे,नितीन खंडाळे,प्रशांत कानडे,अभिजीत मापारी ,पंकज जेधे, वैभव नहार उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश मापारी म्हणाले की,मागच्या वर्षी देखील युवा नेते उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी २५१ जणांनी रक्तदान केले होते आजच्या या उपक्रमास सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज दुपारपर्यंतच ४० नागरिकांनी रक्तदान केले आहे ते अजून निश्चित वाढेल या पुढील काळातही हे कार्य असेच अखंडित सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्नअसेल , आज ज्या रक्तदात्यांनी रक्तदान करून अमूल्य सहकार्य केले त्यांचा मी आभारी आहे. कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष सतीश पिंपळे,मा.उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,काका गायके,संचालक शिवा जंगले,नारायण लोखंडे, बाळासाहेब कोकणे , के.एच.वाखुरे,न गरसेवक रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, जितेंद्र कुऱ्हे तसेच अस्लम मन्सूरी, शोएब पठाण, अस्लम मनियार, विशाल सुरडे, सर्जेराव तुवर, नितीन पाठक, राजू लोखंडे सुनील जाधव, जयदीप जामदार उपस्थित होते. रक्तदान प्रसंगी अष्टविनायक रक्तपेढीचे सहकार्य लाभले.