राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींचा संघ घोषित

नेवासा (प्रतिनिधी) :- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया,महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने अहमदनगर जिल्ह्यातील त्रिमूर्ती क्रीडा संकुल नेवासा येथे १७ वर्षाखालील मुलींची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा मुलींचा संघ घोषित करण्यात आला.संघाच्या प्रशिक्षकपदी श्री अजित पाटील तर संघ व्यवस्थापक म्हणून श्री पापा शेख हे काम बघणार आहेत.निवड झालेल्या संघाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे सहसंचालक डॉ जयप्रकाश दुबळे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय संतान,अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सौ कविता नावंदे,महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री पार्थ दोषी, क्रीडा मार्गदर्शक श्री विशाल गर्जे आदींनी शुभेच्छा दिल्या.
*निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे*: १)सिद्धी जानकर (बारामती) २)श्रावणी कोलते (बारामती) ३आरती कांबळे (भिलवाडी) ४)मनोरमा देसाई (भिलवाडी) ५) रक्षा केनवार (कारंज्या) ६)वेदिका शिंदे (इस्लामपूर) ७)संजना जगताप (नाशिक) ८)वैष्णवी सलोडकर (सांगली) ९)ऋतुजा नकाते १०)वैष्णवी बुद्गुळजार (धुळे) ११)प्रगती शिंदे (अहमदनगर) १२) संचारी भौटे नागपूर.