जिल्हाधिकारी काय कारवाई करतात या कडे अनेकांचे लक्ष
उपसंपादक सुरेश बागडे(परंडा)
कोरोना चा संसर्ग रोखान्या साठी उस्मानाबाद चे जिल्हा प्रशासन दिवस रात्र प्रयत्न करीत असताना परंडा येथिल आरोग्य विभागा कडूनच सोशल डिस्टन्सिंग चे उल्लंघन करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असुन फिटनेस प्रमाणत्र मिळवीन्या साठी दि ५ मे रोजी नागरीकांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसुन आले या प्रकरणी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी काय कारवाई करतात या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की ठिक ठिकाणी अडकलेल्या मजुरांना मुळ गावी परतन्याची शासनाने परवानगी दिल्याने राज्य , व परराज्यातील नागरीकांनी परंडा येथिल उप जिल्हा रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्र मिळवीन्या साठी गेल्या तिन दिवसा पासुन मोठी गर्दी केली असुन सोशल डिस्टन्सिंग चे नियमांचे राजरोस पणे उल्लंघन होत असताना आरोग्य प्रशासन या गंभीर प्रश्ना कडे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न नागरीकाना पडला आहे , हा हलगर्जी पण गेल्या दिड महीन्या पासुनच्या लॉकडाऊन वर पाणी तर फेरणार नाही ना ?
कारण या गर्दीत परराज्या सह शहरातील अनेक नागरीक आहे या प्रकरणी तालुका व जिल्हा प्रशासन काय कारवाई करतात या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे .