
अहमदनगर ( प्रतिनिधी ):- नगर येथील विळद घाट मधील डॉ. विखे पाटील मेमोरियल रुग्णालय व क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रा. लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विषाणू (Covid-१९) नमुना संकलन केंद्र ‘डॉ. विखे पाटील मेमोरियल रुग्णालय’ सुरु करण्यात आले.
आतापर्यंत ८ संशयिताचे स्वाब टेस्ट (घशातील नमुने) घेतले असून हे नमुने क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रा. लि. पुणे येथे चाचणीसाठी पाठवले जातात. प्रयोगशाळेकडून अहवालही प्राप्त झाले आहेत, अशी माहिती डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मेडिकल विभागाचे उपसंचालक डॉ. अभिजित दिवटे यांनी दिली.
देशात कोरोना व्हायरस अत्यंत वेगाने फेलाव होत असल्याचे चित्र दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण आहे. अशा जीवघेण्या विषाणूशी लढण्यासाठी केंद्र व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपापयोजना युद्ध पातळीवर अहोरात्र प्रयत्न करून राबवित आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती पाहता नागरिकांचे स्वाब नमुने घेण्यास आणि कोरोनाग्रस्थ रुग्णांवर उपचार वेळेवर व्हावे म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ह्या संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
‘क्रस्ना डायग्नॉस्टिक्स’ ही लॅब ‘आयसीएमआर’ आणि ‘एनएबीएल’ मान्यताप्राप्त असून या प्रयोगशाळेला कोविड-१९ चाचणीची परवानगी सरकारने दिलेली आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका पल्लवी जैन यांनी दिली.
परराज्यातील आणि महाराष्ट्रांतर्गत जिल्ह्यातील अडकलेले प्रवाशी घरी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली असता या प्रवासादरम्यान ‘हॉस्टस्पॉट’ झोनमधील किंवा पॉसिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले कोरोना विषाणूची पार्श्वभूमी नसणाऱ्या व्यक्तीला कोरोनासदृश लक्षणे वाटत असतील तर त्यासाठी संस्थेच्यावतीने स्वाब नमुना घेण्यासाठी प्रतिनिधी घरी बोलावून ही सुविधा घेऊ शकता. अधिक माहितीसाठी ७४२९९१४२०८/२५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.