आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांना मिळणार विमा कवच
अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांचा १ कोटी रुपयांचा विमा उतरविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५३ पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर ऑच्छपत्रकारांचा, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा ,वृत्तपत्र छायाचित्रकारांचा विमा उत्तरविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
पत्रकार ,संपादक संवाद समितीचे मुख्य सल्लागार प्रकाश भंडारे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना मुश्रीफ यांनी वरील माहिती दिली.
या शिवाय दुष्काळी भागातील विद्यार्थ्यानची फी माफ करणे तसेच त्यांच्या माध्यान्न भोजनाची सोय करणे ,आदी प्रस्तावही विचाराधीन असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
यंदा पावसाळा चांगला असल्याने शासनाने खरीप पिकांचे नियोजन केले असून बियाणे ,खते यांचा काळाबाजार झाल्याचे ऐकिवात आल्यास त्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.