नेवासा, ( प्रतिनिधी ):- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी लागू करुन लॉकडाऊन केल्याच्या कालखंडात हातात दंडूका घेवून कर्तव्यावर आसतांना शिस्तीमुळे कधी दंडूका उगरावा लागतो तर कधी प्रसादही द्यावा लागत आसतांना हे दुहेरी कार्य करतांनाच आपल्या खाकीवर्दीच्या आतमध्येही माणूसकी आसल्याचे नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सुहास गायकवाड यांच्या रुपातून समोर आले आसून कर्तव्यात आसतांना वाटच्या वाटसरुंना आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्या पोटात दोन घास अन्न पदरात पडावे म्हणून कर्तव्यात आसतांनाही वाटसरुंची काळजी घेणारा खराखुरा पोलिस सुहास गायकवाड यांच्या रुपातून समोर आलेला आहे.
लॉकडाऊनमुळे आपल्या घराची पायी वाट धरण्यासाठी गोरगरीब कष्टकरी लोक बाहेरुन आपल्या गावी जाण्यासाठी रस्त्यावरुन भल्या पहाटेच पायी जात होते.पोलिस दिसले की,वाटसरुंच्या मनात भिती आसतांना हा खाकीवर्दीतील अवलिया… त्यांना अस्थेवाईकपणे विचारुन रस्त्याच्या कडेला मिञमंडळाच्या माध्यमातून त्यांची अल्पउपोहराची सोय करुन देण्यात बंदोबस्ताचे काम करुन पोलिस हवालदार गायकवाड मग्न होते.
नेवासा शहरातील गौरव गुगळे,अभिषेक गाडेकर,दिपक सोनवणे,अभिषेक ढोकणे व मिञ मंडळाने परराज्यातील गोरगरीबांसह वाटसरुंना आधार देण्याचे ठरले स्वताची वर्गणी जमा करुन दानशुरांचीही ते मदत घेत होते यामध्ये पोलिस हवालदार गायकवाड यांचा मोठा वाटा आसून या अल्पउपहाराची संकल्पनांच त्यांनी मिञमंडळीच्या रुपातून समोर आणली होती त्यामुळे खाकीवर्दीच्या आतही आसतो माणूसकीचा झरा हेच गायकवाड यांनी दाखवून देत कर्तव्यावर आसतांनाही वाटसरुंच्या जीवाची काळजी घेणारा खुराखुरा पोलिस हवालदार गायकवाड यांच्या रुपातून नेवासकरांना सध्या अनूभवण्यास मिळत आहे