कुकाण्यात सकाळी ८ते दुपारी१ या वेळेतच दुकाने खुली राहणार

नेवासा ( काकासाहेब नरवणे ) :- आजपासुन 199 आस्थापना खुली करण्यात आली. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.

त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार, श्री. द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहे.
कुकाणा ग्रामपंचायत कार्यालय येथे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमी वर सरपंच छायाताई गोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली .सकाळी ८ ते दुपारी १ या कालावधीत दुकाने खुली करण्याचे ठरवण्यात आले .यावेळी उपसरपंच शिवगंगा सदावर्ते,मा.सरपंच दौलत देशमुख,मा.सरपंच एकनाथ कावरे,कारभारी गोर्डे,उमेश सदावर्ते,मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे,ग्रामपंचायत सदस्य जवाहर भंडारी,पत्रकार अनिल गर्जे, अमोल अभंग,बापूसाहेब खराडे,,ईस्माइल शेख,सोमनाथ कचरे,अभिजित लुणिया,बाळासाहेब कचरे ,भारत गरड,वसंत गवळी,कुकाणा पोलिस औटपोस्टचे नाईक किशोर काळे,आरोग्य विभागाचे कर्मचारी ,ग्रामविकास अधिकारी सुभाष गर्जे यांनी सर्व दुकानदारांना सेनिटाईझरचा ,मास्कचा वापर करून सोशल डिस्टंसिंच्या नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच बाहेरून आलेल्या १६ लोकांना वेगळ्या कक्षात काँरंटाईन करण्यात आले आहे .कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

२७ मे रोजी शारीरिक अंतर पाळून सर्वत्र निषेध व प्रतिकार दिन पाळणार – किसान सभा

🔊 Listen to this   मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ):– मोदी सरकारच्या सातत्याच्या दुर्लक्षाविरुद्ध शेतकऱ्यांची …