गावठी दारू भट्टीची माहिती देऊनही कारवाई शून्य ; कर्जत पोलीसांकडून होते अवैध धंदेवाल्यांची पाठराखण

कर्जत (प्रतिनिधी):- ग्रामीण भागात गावठी दारूने मोठा उच्छाद मांडला असून सरासरी प्रत्येक गावात थोडी चौकशी केली तरी याची माहिती मिळू शकते मग स्वतंत्र गुप्त वार्ता विभाग असलेल्या पोलीस विभागाला याचा सुगावा नाही यावर कोणाचाही भरवसा बसणार नाही मात्र याकडे पोलीस विभाग जाणून बुजून कानाडोळा करत असून ग्रामीण भागात लॉकडाऊन होत असताना जे लोक बाहेर दिसत आहेत त्यातील बहुतेक लोक या पेयाच्या शोधासाठी बाहेर दिसत आहेत, ग्रामीण भागातील अनेक गावांनी अवैध हाथभट्टी चालकांवर कारवाया केल्या मात्र त्यातील अनेक कारवाया कागदावर आल्याच नाहीत, कुळधरण येथे माजी सरपंच अशोकनाना जगताप यांनी स्वतः दारू पकडून दिली ती कोणाची होती हे दाखवून दिले मात्र पोलिसांनी त्या व्यक्तीशी चर्चा करून कोणतीच कारवाई केली नाही तर पाटेगावात सरपंच गोकुळ इरकर यांनी ही एका घरातून दारू पकडली मात्र त्यावरही कोणतीच कारवाई झाली नाही, राक्षसवाडित ग्रामस्थानी कारवाई केली पण ती आपसात मिटवत पोलिसांपर्यत जाऊच दिले नाही तर आंबीजळगाव येथे सरपंच विलास निकत यांनी अवैध हाथभट्टी नष्ट केली मात्र ती कोणाची होती त्याचे वर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही याचा अर्थ अनेक गावाचा पोलिसांवरच विश्वास राहिला नाही त्यामुळे ते पोलिसांना खबर देण्याची तसदी ही घेत नाहीत,
आज लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था राबविण्यात पोलिसांचे कौतुक होत असताना या काळात वाढलेल्या अवैध धंद्याकडे होत असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय आहे.
कर्जत येथे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्जत उपविभागात दारूवर केलेल्या कारवाईची यादीच सादर केली व उपविभागीय अधिकारी संजय सातव व उपविभागाचे कौतुक ही केले होते मात्र या यादीत अनेक कारवायाचा उल्लेखच नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अंबिजळगाव ग्रामपंचायतची दबंग कारवाई
कर्जत तालुक्यातिल अंबिजळगाव येथे ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा दलाकडुन गावातिल दारु विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात आली लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच मद्यविक्री करणारी दुकाने बंद आहे तरी देखील तालुक्यातील काही ग्रामीण भागातुन गावठी दारु विक्री केली जात आहे .या पाठपुराव्यासाठी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदाम निकत . गावचे सरपंच विलास निकत यांनी कर्जत पोलीस स्टेशनला लेखी पञाद्वारे कळवण्यात आले होते तरी देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही.म्हणून काही तरुण वर्गाने व गावचे पोलीस पाटील बिबिषण अनारसे यांनी दुरु दुकानावर दंबगीरी करत कडक कारवाई केली या वेळी ,ग्रामसेवक ज्ञानेश्वर आजबे ,साह्य्यक ग्रामसेवक शिवाजी धांडे ,ग्रामपंचायत कर्मचारी .मच्छिंद्र लोंढे ,नामदेव यादव व पोलीस पाटील बिभीषण अनारसे पत्रकार .दिलीप अनारसे अजित अनारसे धनंजय निकत यांच्या सह युवा नेतृत्व .सुदाम निकत ,सतिश निकत .अजित अनारसे सागर निकत , ,अमोल गायकवाड ,आकाश निकत ,किशोर निकत ,बंडू निकत रोहित निकत इत्यादी ग्राम सुरक्षा दलातील कार्यकर्त्यांसह अवैध्य दारू विक्री करणाऱ्या स्थळी छापा टाकून तेथील दारूचे साठे उध्वस्त केले.या पूर्वी तोंडी सांगून ,अवैध्य दारू कायमस्वरूपी बंद करण्यात यावी असा ठराव करून , अवैध्य दारू विक्री चालु असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामपंचायत कार्यालयाने निर्णय घेऊन हि कारवाई केली.या पुढे आंबीजळगाव हद्दीत अवैध्य दारू विक्री केली गेल्यास कठोर कारवाई करून प्रतिबंधात्मक दंड आकारला जाईल असे सरपंच विलास निकत यांनी सागितले…

Check Also

२७ मे रोजी शारीरिक अंतर पाळून सर्वत्र निषेध व प्रतिकार दिन पाळणार – किसान सभा

🔊 Listen to this   मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ):– मोदी सरकारच्या सातत्याच्या दुर्लक्षाविरुद्ध शेतकऱ्यांची …