संगमनेर ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी मृत्यू झाला. सदर व्यक्ती तीन ते चार दिवसांपुर्वी संगमनेर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी आला होता. त्यावेळी या व्यक्तीचा स्वॅब घेत तो मुंबई येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सकाळी या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर दुपारी या व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला. त्यावेळी सदर मयत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर शहर व तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मयत व्यक्ती उपचारासाठी आलेल्या खासगी रूग्णालयाच्या डॉक्टरांना प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन केले आहे. तर मयत व्यक्तीवर उपचार करणारे डॉक्टर यांच्यासह तेथील इतरही डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि मयत व्यक्तीचे कुटुंबीय, नातेवाईक असे किती नागरिक या व्यक्तीच्या संपर्कात आले? याचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आसल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.