अहमदनगर जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाचे ७ रुग्ण वाढले ; जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या आता ५१ झाली आहे.

 

अहमदनगर ( प्रतिनिधी ):- संगमनेर येथील १ महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील ४ जण असे ५ जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी २ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आणि या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे काल दिवसभरात जिल्ह्यात एकूण ७ रुग्ण आढळून आले आहे. आलेल्या या अहवालानुसार बाधित व्यक्तींमध्ये २८ वर्षीय महिला आणि ५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील आत्तापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ५१ झाली आहे. आढळून आलेल्या या २ बाधित व्यक्ती परवा मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईक आहेत.

Check Also

स्कार्पिओ – इनोव्हा भिषण अपघात दोघे गंभीर ; घोडेगाव शिवारातील घटणा

🔊 Listen to this   नेवासा ( प्रतिनिधी ) :- नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव जवळ तुकाईशिंगवे …